लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भुसावळ ते बडनेरा दरम्यान रेल्वे गाड्या व प्लॅटफॉर्मवर अवैधरीत्या खाद्य पदार्थ, शीतपेय, चहा व कॉफी विक्रीला लगाम बसविला आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे नवनियुक्त प्रबंधक राम किरण यादव यांनी रेल्वेत वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेतली आहे. रेल्वे गाड्या किंवा प्लॅटफार्मवर काही गैर आढळल्यास यापुढे रेल्वे सुरक्षा बलाला जबाबदार धरले जाईल, असा फतवा त्यांनी काढला आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर अवैध खाद्य पदार्थ विक्रीस वेंडर्संना गत आठवड्यापासून मनाई करण्यात आल्याची माहिती आहे.धावत्या रेल्वे गाड्यात प्रवाशांचे साहित्य, बॅगची उचलेगिरी आणि मोबाईल चोरी या नियमित घटना आहेत. मात्र, गत पाच वर्षांत रेल्वेत झालेल्या चोरीच्या घटनांपैकी बोटावर मोजण्याइतके आरोपी पकडण्यात आले आहे. मात्र, अकोला येथील खेडकरनगरातील रहिवासी अॅड. मंजूषा सारंग ढवळे या कुटुंबीयासोबत २४ एप्रिल २०१९ रोजी आनंदवन एक्सप्रेसने (गाडी क्रमांक ०२२१८) हिंगणघाट येथून अकोलाकडे येत असताना सोने, चांदी आणि दोन मोबाईल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बडनेरा रेल्वे स्थानकावर निदर्शनास आली. बॅगेत अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल असल्याची तक्रार अॅड. ढवळे यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविली. ही घटना धामणगाव ते बडनेरा दरम्यान घडली. याप्रकरणी अवेज खान ऊर्फ लकी युसूफ खान (२५, रा. कारंजा लाड) या आरोपीस अटक केली आहे. मात्र, दिवसाढवळ्या रेल्वे गाड्यांत चोरीच्या घटना कशा आणि कोणामुळे घडतात? याविषयी भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांना त्यांनी निवेदनातून जाब विचारला. त्यानंतर प्रबंधक यादव यांनी रेल्वे सुरक्षा बलाची कानउघाडणी केली. थेट प्रबंधकांनी कानउघाडणी केल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाची दाणादाण झाली. आता यावर ब्रेक लावले आहे.ओळखपत्र, परवाना तपासणी मोहीमरेल्वेत वा प्लॅटफार्मवर खाद्यपदार्थ, चहा, कॉफी, शीतपेय विक्रेत्यांचे ओळखपत्र व परवाने तपासणी युद्धस्तरावर रेल्वे सुरक्षा बलाने चालविले आहे. ज्यांच्याकडे रेल्वे विभागाचा अधिकृत परवाना आहे, तेच वेंडर्स खाद्यपदार्थ विक्री करू शकतील, अशा सूचना आरपीएफने कंत्राटदारांना दिल्यात. बडनेरा, अकोला, मूर्तिजापूर, शेगाव, भुसावळ रेल्वे स्थानकावर ही मोहीम सुरू आहे.रेल्वे गाड्या अथवा प्लॅटफॉर्मवर अनधिकृत हॉकर्सवर निरंतरपणे कारवाई केली जात आहे. याबाबत कंत्राटदारांना अवगत केले आहे. काही गैर आढळल्यास खाद्य पदार्थ विक्रत्यांचे परवाने निलंबित करण्याची आमची तयारी आहे.- के. भाकर, निरीक्षक,रेल्वे सुरक्षा बल, बडनेरा
रेल्वेत अवैध खाद्य पदार्थ विक्रे त्यांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 1:38 AM
भुसावळ ते बडनेरा दरम्यान रेल्वे गाड्या व प्लॅटफॉर्मवर अवैधरीत्या खाद्य पदार्थ, शीतपेय, चहा व कॉफी विक्रीला लगाम बसविला आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे नवनियुक्त प्रबंधक राम किरण यादव यांनी रेल्वेत वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेतली आहे.
ठळक मुद्देभुसावळ ते बडनेरादरम्यान कारवाई : वाढत्या चोरीच्या घटनांची नव्या प्रबंधकांनी घेतली दखल