फोटो- केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे समस्या माडतांना आ प्रताप अडसड
------------------------------------------------------------------------------------------------------------
तिन्ही तालुक्यांचा प्रश्न मांडला, प्रताप अडसड यांच्याकडून पाठपुरावा
धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील टीमटाला येथे चांदूर रेल्वे-अमरावती बायपास, चांदूर रेल्वे शहरानजीक अर्धवट असलेला रेल्वे उड्डाणपूल तसेच धामणगावातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता दोन अंडरपासचा विषय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आ. प्रतीप अडसड यांनी मांडला. रेल्वेमंत्र्यांची त्यांनी दिल्ली येथे भेट घेतली.
तळेगाव दशासर-चांदूर रेल्वे-अमरावती मार्गात रेल्वे क्रॉसिंग आहे. नागपूरहून यवतमाळला जाण्याकरिता या रेल्वे फाटकावर अनेक वेळा वाहनधारकांना उभे राहावे लागते. त्यामुळे येथे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. टिमटाला या गावाजवळून रेल्वे लाईन गेली आहे. या परिसरातील लोकांना ती ओलांडून ये-जा करावी लागते. येथे सुविधा दिलेली नाही.
चांदूर रेल्वे शहराजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने चालू आहे. त्या कामाला गती मिळावी तसेच धामणगाव रेल्वे शहरातील प्रस्तावित दोन्ही अंडरपासबाबत निविदा प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी. चांदूरवासीयांची रेल्वे थांब्याची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी आ. अडसड यांनी केली. या पाचही कामांबाबत सकारात्मक असल्याचे रेल्वेमंत्री गोयल म्हणाले. याविषयी खासदार रामदास तडस यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे