शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

रेल्वे गेटकीपरला मारहाण, पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:18 PM

नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देमद्यपींचा धिंगाणा : सर्तकतेमुळे रेल्वे थांबल्याने अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.माहितीनुसार, धीरज प्रभाकर बरडे (३०, रा. धापेवाडा ता. सावनेर), ज्ञानेश्वर बबनराव पानपते ३२ रा. ब्रम्हपुरी, मंगेश अजाबराव उईके ३५ रा. कळमेश्वर, धमेंद्र पंजाबराव लोणकर (२७ रा. सांवगी), विशाल पुरुषोत्तम गोतमारे (२७, रा. घोराड ता. कळमेश्वर जि. नागपूर) अशी आरोपींची, तर प्रमोद कपले (३०, रा. वरुड) असे जखमी कर्मचाºयाचे नाव आहे. रेल्वे गाडी येणार म्हणून रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे गेट बंद होत असताना नागपूरकडे जाणारी कार क्र.एम.एच ३१ डीसी ४५८६ ने आरोपी वरूडहून येत होते. रेल्वे गेट का बंद केले म्हणून रेल्वेलाईनवर गाडी उभी केली. तेव्हा या गेटकिपरने गाडी काढा म्हणून हटकले असता, या युवकांनी दारूच्या बॉटलने आणि लोखंडी रॉडने गेटकिपर प्रमोद कपले यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तेथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सूचना केली. पळून जाणाºया आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून पोलीस आणि नागरिकांंनी चारचाकी वाहन पकडले. यासंदर्भात वरूड पोलिसांनी पाचही मद्यपी युवकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले.कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने अनर्थ टळलारोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवर गेटकिपरने गेटबंद केल्याने पाच टवाळखोरांनी युवकांनी गेटकिपरला रॉड आणि दारुच्या बॉटलने मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार होऊनसुद्धा दुर्घटना होऊ नये म्हणून कशीबशी सुटका करु़न रेल्वेचालकाला सुचना दिली आणि रेल्वे थांबविली. यामुळे मोठा अनर्र्थ टळून हजारो प्रवाशांसह नागरिकांचे तसेच आरोेपींचेसुध्दा प्राण वाचले.