लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा लग्नप्रसंग, शाळा-महाविद्यालयांना सुट्या, पर्यटनस्थळी मौजमजा करण्याचे बेत अनेक जण आखत असले तरी रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण १५ मार्चपासून हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर ‘नो रूम’ फलक झळकत आहे.मध्य रेल्वेकडून देशभरातील कानाकोपऱ्यात ये-जा करण्यासाठी अधिक रेल्वे गाड्या आहे. परंतु, अलीकडे प्रवाशांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी उन्हाळा प्रारंभ होताच रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सुरू केल्या जातात. काही प्रवाशांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच प्रवासाचे नियोजन आखले आहे. १५ मार्चनंतर लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही दलालांनीसुद्धा तिकीट आरक्षण केले. नंतर ही तिकिटे चढ्या दराने विकली जातील.दिल्ली, मुंबई, चैन्नई, अहमदाबाद, पुणे, हावडा आदी मार्गावर गाड्यांमध्ये मार्च ते मे २०१९ दरम्यान आरक्षण नसल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी उन्हाळ्यात सहल, पर्यटनस्थळ आणि लग्न समारंभात जाण्याची ओढ असलेल्या अनेकांच्या आनंदावर विजरण येण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे येथून गावी परतणाºयाची मोठी गर्दी असून, हावडा, दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद मार्गे जाण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकावरून आरक्षणासाठी मागणी होत आहे. रेल्वे खिडक्यावर आरक्षण नाही. रेल्वे तिकीट दलालांनी काही महिन्यांपूर्वीच उन्हाळा ‘कॅश’ करण्यासाठी आरक्षण करून ठेवल्याची माहिती आहे.
या गाड्यांना पसंती४विदर्भ एक्सप्रेस, अमरावती-मुंबई एक्सप्रेस, हावडा-मुंबई गितांजली आणि मेल, हावडा-अहमदाबाद सुपर डिलक्स एक्स्प्रेस, गोंडवाना एक्स्प्रेस, गरीबरथ, अमरावती- पुणे एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, कुर्ला-हावडा एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस, पुणे-अजनी विशेष रेल्वे आदींचा समावेश आहे.फेब्रुवारी अखेरपर्यंत काही रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत आहे. मात्र, अंबा एक्स्प्रेस सतत हाऊसफुल्ल आहे. मार्च महिन्यात आरक्षणाची स्थिती फारच गंभीर आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ‘नो रूम’ झळकत आहे.- शरद सयाम, वााणिज्य निरीक्षक, बडनेरा रेल्वे स्थानक