शामकांत सहस्त्रभोजने
असाईनमेंट पान ३
फोटो पी ०८ बडनेरा रेल्वे
बडनेरा : अनलॉक होताच रेल्वेगाड्या, एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली. जेमतेम असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे आरक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून सोमवारी ‘लाल परी’च्या ४९६ फेऱ्या धावल्या. प्रवाशांमध्ये अद्यापही कोरोना संसर्गाबाबत भीती कायम आहे. सावध प्रवास करण्यावर त्यांचा भर दिसून आला.
अमरावती जिल्ह्यातल्या प्रवाशांनी रेल्वे गाड्यांसह एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करण्याला पसंती दिली. सोमवारी व मंगळवारीदेखील प्रामुख्याने रेल्वेवर अधिक गर्दी दिसत आहे. सध्या मोजक्या रेल्वेगाड्या धावत आहेत. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नोकरीनिमित्त, व्यवसायासंबंधी, वाहने उपलब्ध नसल्याने अडकून असलेले लोक बाहेरगावी जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेचे सहज आरक्षण मिळत होते. मात्र, आता वेटिंग मिळत आहे.
‘लाल परी’च्या सोमवारी ४९६ फेऱ्या धावल्या. लातूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला यांसह जिल्ह्यातील गावांमध्ये आलेल्या एसटी बसना प्रवाशांची मुबलक संख्या लाभली. काही बसमध्ये गर्दीही होती. तथापि, कोरोना संसर्गामुळे होणारी हानी डोळ्यांपुढे कायम असल्याने प्रवाशांकडून संपूर्ण काळजी बाळगूनच प्रवास केला जात असल्याची स्थिती आहे.
–--------------------------------
प्रतिक्रिया
लॉकडॉऊनमुळे मी विविध ठिकाणी अडकलो होतो. आता कोरोना संसर्गाची भीती कमी झाली आहे. एसटी महामंडळाच्या बसने औरंगाबाद या मूळ गावी परत जाण्यासाठी प्रवास करीत आहे.
सूरज गावंडे, प्रवासी, औरंगाबाद
* मी शासकीय कर्मचारी आहे. लॉकडाउनमुळे बस बंद होत्या. अनलॉक झाल्याने त्या सुरू झाल्या. कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी हे सोयीचे झाले आहे. संपूर्ण काळजी घेऊनच प्रवास करीत आहे.
- मंगेश डोंगरे, प्रवासी, अमरावती
* संपूर्ण महाराष्ट्रात संसर्गाचा प्रकोप कमी झाला आहे. शासनाने बऱ्यापैकी शिथिलता दिली आहे. मी दवाखान्याच्या कामानिमित्त मुंबईला रेल्वे गाडीने जात आहे. संसर्ग अधिक असल्याने प्रवास करू शकलो नाही.
- राजेश पुसदकर, प्रवासी, अमरावती
* माझे नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. कोरोना संसर्गाची आकडेवारी मोठी असल्याने दोन महिन्यांपासून घरूनच काम करीत होतो. आता तेथे भेट देणे गरजेचे आहे. रेल्वेने संपूर्ण काळजी घेऊन प्रवास करीत आहे.
- सुधीर मंत्री, प्रवासी, अमरावती
एसटी बस स्वच्छ व सॅनिटाईझ केल्या जात आहेत. आगारातील ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांना मास्क लावण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अनलॉकमुळे प्रवाशांची गर्दी काहीशी वाढली आहे.
- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, अमरावती.
रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये अजूनही पाहिजे तशी गर्दी नाही. काही गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक दिसून येते. अनलॉकमुळे प्रवासाची नेमकी स्थिती यापुढे पाहावयास मिळेल.
- .................................................., ...................................
* एसटी बसफेऱ्या - ४९६
* प्रवाशांची संख्या - १८ हजार
* रेल्वे गाड्यांची संख्या - दररोज २०