फोटो पी ३० जावरे फोल्डर
परतवाडा : रविवारी दुपारी ३ वाजता काही मिनिटांसाठी मुसळधार पावसाने अचानक हजेरी लावली. जोरदार सुटलेल्या वादळ वाऱ्यात परतवाडा अमरावती मार्गावरील खासगी पेट्रोल पंप परिसरासह रस्त्याने १५ ते २० झाडे व झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
आठवडाभरापासून तालुक्यात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच अचानक रविवारी दुपारी काही क्षणासाठी कोसळलेला मुसळधार पाऊस आणि वादळवाऱ्यात अमरावती परतवाडा मार्गावर एका खासगी पेट्रोल पंप, अचलपूर नाका व मार्गावर अनेक ठिकाणी ठिकाणी मोठे झाड उन्मळून पडली. सामाजिक कार्यकर्ते बबलू चरोडे, गोपाल चरोडे चमक, भूषण घडेकर व काही सहकाऱ्यांनी पडलेले झाड रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
आड मार्गाने वाहतूक, धोकादायक ठरले वृक्ष
परतवाडा अमरावती या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. पण अचानक रविवारी दुपारी वादळाने १५ ते २० झाडे पात्यासारखी रस्त्यासह नजीकच्या शेत जमिनीवर कोसळली. त्यामुळे वाहनधारक आडमार्गाने वाहने काढत होते. अनेक वर्ष जुनी झालेली वृक्ष जमिनीतून सडल्याने ती आता धोकादायक ठरू लागली आहेत.