लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अरबी समुद्रावरून वाहणारे वारे अत्यंत कमी बाष्प आणत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींमुळे विदर्भात पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात काही घडामोडी नसल्याने विदर्भात मुंबईकडून येणारा पाऊस आता इतिहासजमा झाल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अरबी समुद्रात असलेल्या हवामानशास्त्रीय घडामोडीमुळे कमी दाबाचे क्षेत्र, किनारपट्टीवर असलेली कमी दाबाची द्रोणीय स्थिती, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेले चक्रीय वारे यामुळे जून महिन्यात विदर्भात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यानंतर मात्र किरकोळ प्रमाणात असलेली द्रोणीय स्थिती आणि अन्य घटकांचा अभाव यामुळे नैऋत्य मान्सूनद्वारे होणारा ढगांचा पुरवठा कमी असल्यामुळे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र कोरडा राहिल्याचे वास्तव आहे.मागील दोन महिन्यात विदर्भात जो काही हलका ते मध्यम पाऊस पडला, तो बंगालच्या उपसागरात तीन ते चार वेळा तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, त्याचे डिप्रेशनमध्ये होणारे रूपांतर आणि वायव्य दिशेने पुढे सरकत जाणे व संबंधित चक्राकार वाऱ्यामुळेच झाला. वायव्य बंगालचा उपसागर किंवा ओरीसा किनारपट्टी अथवा आंध्र किनारपट्टी यावरील चक्राकार वाºयामुळे विदर्भावर मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणले जाते. यामुळे पूर्व विदर्भ, नागपूर व वर्धा भागात बºयापैकी पाऊस होतो. परंतु हेच ढग ज्यावेळी अमरावती, अकोल्याच्या आसपास येतात, त्यावेळी पश्चिमेकडून येणारे नैऋत्य मोसमी वारे या ढगांना उत्तरेकडे ढकलतात. परिणामी अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानासुद्धा रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.आठवडाभर पावसाची हीच स्थिती कायममान्सूनची पश्चिम धुरी उत्तरेकडे सरकली असल्याने हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. विदर्भावर सक्रिय जोडक्षेत्रसुद्धा पश्चिमेकडे सरकल्यामुळे मान्सूनची सक्रियता सध्या कमी झालेली आहे. बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे मान्सून कमकुवत झालेला आहे. उत्तर छत्तीसगढच्या तीन ते सहा किमी उंचीवर तसेच गुजरात, कोकणवर पाच ते आठ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भावर ढग जमा होत आहे. मात्र, अन्य परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे सध्या पावसाची शक्यता नाही. विदर्भात पावसाची ही स्थिती आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.जिल्ह्यात १ जून ते १ सप्टेंबर या कालावधित ६४८ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही ८४ टक्केवारी आहे. पावसाचे ९० दिवस झाले असताना जिल्ह्यातील नांदगाव, चांदूर रेल्वे व दर्यापूर वगळता उर्वरीत ११ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहे.
मुंबईकडून येणारा पाऊस इतिहासजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:19 PM
अरबी समुद्रावरून वाहणारे वारे अत्यंत कमी बाष्प आणत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींमुळे विदर्भात पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात काही घडामोडी नसल्याने विदर्भात मुंबईकडून येणारा पाऊस आता इतिहासजमा झाल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
ठळक मुद्देबंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जिल्ह्यात पाऊस