लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता मान्सूनपूर्व सरी बरसल्याने अमरावतीकरांना उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळाला. वादळी वारे व विजेच्या गडगडाटामुळे काही वेळाकरिता जनजीवन विस्कळीत झाले होते.एप्रिल अखेरपासून उन्हाचा सर्वाधिक तडाखा अमरावतीकरांना बसला. २९ मे रोजी पारा ४७ अंशावर होता. आता पुढे हळूहळू उन्हाच्या झळा कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला होता. सोबत विदर्भात काही ठिकाणी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली होती. हे भाकीत खरे ठरले असून, विदर्भातील काही शहरांसह अमरावतीतदेखील पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले. बेनाम चौकातील तीन वृक्ष तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा अद्याप खंडित आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून रस्त्यावर कोसळलेले वृक्ष बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शहरातील दहा ते बारा ठिकाणी वृक्षांमुळे फलकांचे मोठे नुकसान झाले. बेनाम चौक, साईनगर, वलगाव रोड, चैतन्य कॉलनी, एमआयडीसी परिसरासह आदी ठिकाणांचे वृक्ष कोलमडून पडले होते. अग्निशमनच्या आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल होईपर्यंत या मार्गातील वाहकतूक ठप्प झाली होती.तिवस्यात वर्दळीच्या ठिकाणी झाड कोसळलेतिवसा : तालुक्यात शुक्रवारी रोजी दुपारी ३.१५ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस कोसळला. नगरपंचायत ते बाजार ओळीकडे जाणाऱ्या मुख्य वर्दळीच्या मार्गावर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात असलेले भिंगरीचे महाकाय झाड कोसळले. नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी मदतकार्याचे निर्देश दिले.रोहणखेडमध्ये वादळ; तीन जनावरांचा बळीमोर्शी : तालुक्यातील रोहणखेड येथे ३१ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळाच्या तडाख्याने विनायक खरबडे यांचा गोठा कोसळल्याने २० हजारांचा घोडा, गाय व वासरूही मरण पावले. म्हैस जखमी झाली आहे. पशुधन विकास अधिकारी गजानन महल्ले यांनी शवविच्छेदन केले. खरबडे यांचा दुुग्धव्यवसाय बुडाला आहे.वीज कोसळून महिलेचा मृत्यूदर्यापूर : तालुक्यातील चांदूर जहानपूर येथील चंद्रकला बकाराम नांदणे ही महिला शुक्रवारी दुपारी ४ वाजता वीज अंगावर कोसळून ठार झाली. ती चंद्रभागा नदीपात्रात मासोळ्या पकडण्याकरिता गेली होती. पोलीस पाटील वानखडे यांच्या माहितीवरून ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी घटनास्थळ गाठले.वाऱ्यामुळे खारतळेगावात अग्नितांडवखारतळेगावात शुक्रवारी सायंकाळी कुटाराच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली होती. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाल्यावर वादळी वाऱ्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागलेले कुटार उडून पसरल्यानंतर अग्नितांडवच सुरू झाले. गाव आगीच्या विळख्यात असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब काही वेळातच पोहोचले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर काही वेळाने पाऊस बसरला. अग्निशमन व पावसामुळे आग नियंत्रणात आली. येवद्याजवळ उमरी मंदिर येथे वादळाने १० घरांचे छप्पर उडाल्याची माहिती आहे.
मान्सूनपूर्व वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:45 PM
शहरात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता मान्सूनपूर्व सरी बरसल्याने अमरावतीकरांना उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळाला. वादळी वारे व विजेच्या गडगडाटामुळे काही वेळाकरिता जनजीवन विस्कळीत झाले होते.
ठळक मुद्देवृक्ष उन्मळले, वाहतूक खोळंबली : शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित