लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात ८६.८१ टक्के जलसाठा गोळा झाल्याने धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले. धरणातून १५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्य प्रदेशात पाण्याचा जोर वाढल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणाच्या पाण्याचा पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणात शनिवारी ९२ टक्के पाणीसाठा गोळा झाल्याने धरणाचे सर्वच ९ दरवाजे उघडन्यात आले होते. मात्र, रात्री १२ वाजता हे दरवाजे पुन्हा बंद करून केवळ तीन दरवाजेच उघडे ठेवण्यात आले. मात्र, सकाळी पाण्याची आवक अधिक वाढल्याने सकाळी धरणाचे सात दरवाजे २५ सेमी उघडण्यात आले आहे. यामधून १५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत असून, पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून वाहणारे हे पाणी देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, थूगाव पिंप्री, निंभोरा, पिंपळखुटा, तोंगलापूर, कुरळपूर्णा या गावातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांतून ओसंडून वाहत आहे. तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. चांदूर बाजार तालुक्यात संततधार पाऊस सुरूच आहे.तालुक्यातील विश्रोळी येथील धरणाच्या भागात २६ मिमी पाऊस झाला असल्याचे नोंद झाली आहे तसेच चांदूरबाजार मंडळात २६ मिमी, बेलोरा १८.२० मिमी, तळेगाव मोहना १५.०२ मिमी, आसेगाव पूर्णा १२.२० मिमी, ब्राम्हणवाडा थडी २५ मिमी, शिरजगाव कसबा १२ मिमी, करजगाव ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी १६.७७ मिमी पाऊस झाला असून तालुक्यात एकूण ६७३.१७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ४८२.६६ मिमी पाउस झाला होता. पूर्णा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे अद्याप गावांना नुकसान झाले नाही, तर मध्य प्रदेशात डोंगरदºयातून धरणात पाणीसाठा वाढत आहे. धरणातून विसर्ग वाढल्यास नदी-नाल्यातील पाणीपातळी अचानक वाढू शकते. यामुळे नदीकाठी राहणाºया नागरिकांनी नदीमध्ये जाणे टाळावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, असे आवाहन तहसीलदार खोडके यांनी केले.
मध्यप्रदेशात संततधार पावसामुळे पूर्णा धरणाचे सात दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:12 AM
तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.
ठळक मुद्देदिलासा : धरणातून १५० घनमीटरने विसर्ग