लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मान्सूनच्या ५७ व्या दिवशी जिल्ह्यातील सात महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या मोसमातील ही पहिली अतिवृष्टी ठरली. जिल्ह्यात तद्वतच गेल्या २४ तासांत ३१.८ मिमी पाऊस कोसळला. यात चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक ६२.२ मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर बरसत असलेल्या पावसाने नांदगाव खंडेश्वर, भातकुली वगळता अन्य तालुक्यांतील नदी नाले वाहू लागली आहेत.तीन आठवडयांच्या दीर्घ दडीने खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर होती. तथापि, दोन दिवसांच्या पावसाने काही पिकांना नवसंजीवनी मिळाली. कपाशीची दुबार पेरणी या संततधार पावसाने साधली. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत एकूण ८९ महसूल मंडळे आहेत. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला. त्यात चिखलदरा तालुक्यातील टेंभुरसोंडा महसूल मंडळात ६७ मिमी, सेमाडोहमध्ये ७४.२ मिमी व चिखलदरा मंडळांत ८७.२ मिमि इतका उच्चांकी पाऊस पडला, तर चिखलदरा तालुक्यात सरासरी ६२.२ मिमी पावसाची नोंद झाली.अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सहा मंडळापैकी सातेगाव ७३ मिमी, विहिगाव ७० मिमी व अंजनगाव सुर्जी ८६ मिमी पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. चांदूर बाजार तालुक्यातील सात महसूल मंडळांपैकी चांदूर बाजार मंडळात सर्वाधिक ८० मिमी पाऊस झाला. अंजनगाव सुर्जी तालुक्यात एकूण ५९.५ मिमी पाऊस पडला. २४ तासात ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टीची नोंद घेण्यात येते.नांदगाव खंडेश्वर तालुका माघारलाउन्हाळ्यात प्रत्येक हॉटेल, कॅन्टीनवर खरेदी केल्याशिवाय पाणीदेखील मिळत नाही, अशा भीषण टंचाईला सामोरे जाणारा तालुका म्हणून नांदगाव खंडेश्वरची ओळख आहे. गतवर्षी या तालुक्यात सरासरी पर्जन्यमान पिकांसाठी पोषक होते. मात्र यंदा पावसाचे ५७ दिवस उलटत असताना केवळ १५९.९ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत तालुक्यात २७५.३ अर्थात ११५ मिमी पाऊस अधिक झाला होता. तालुक्यातील आठ महसूल मंडळांपैकी दाभा - १२ मिमी, धानोरा गुरव - ३.१ मिमी, माहुली चोर - ५.३ मिमी, लोणी - १२.२ मिमी), पापळ - २.२ मिमी), शिवणी - १ मिमी, मंगरुळ चव्हाळा २ मिमी, तर नांदगावात २.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सात महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 1:17 AM
मान्सूनच्या ५७ व्या दिवशी जिल्ह्यातील सात महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या मोसमातील ही पहिली अतिवृष्टी ठरली. जिल्ह्यात तद्वतच गेल्या २४ तासांत ३१.८ मिमी पाऊस कोसळला. यात चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक ६२.२ मिमी पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्दे२४ तासात ३१.८ मिमी पाऊस । चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक