लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रचलित पद्धतीनुसार जिल्ह्यात एक जून ते ३० सप्टेंबर याकालावधीत पावसाळा गृहित धरण्यात येतो. या कालावधीत जिल्ह्यात पावसाची ८१४ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ५४८ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ६७.३ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ६७.३ टक्के आहे. आता पावसाळा संपल्यामुळे यापुढे बरसणारा पाऊस हा अवकाळीच राहणार आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाची ४१४.६ मिमीची तूट आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाने दडी दिली आहे. गतवर्षी ४९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यातुलनेत यंदा फक्त पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर गेलेच नाहीत. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढलीच नाही तसेच जमिनीत पुरेशा आर्द्रतेचादेखील अभाव आहे. कमी पावसामुळे यंदा मूग व उडीद पीक बाद झाले, तर सोयाबीनच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होणार आहे. शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. प्रतिकूल वातावरणामुळे खरिपाच्या पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळेसुद्धा सरासरी उत्पादनात घट येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात अमरावती तालुक्यात ४७० मिमी, भातकुली ४३२.८, नांदगाव खंडेश्वर ४६१.४, चांदूररेल्वे ४९४, धामणगाव रेल्वे ४६०.१, तिवसा ५५६.८, मोर्शी ५९७.९, वरूड, ७३३, अचलपूर ४२०.७, चांदूरबाजार ५१७, दर्यापूर ३९९.३, अंजनगाव सुर्जी ३८३.२, धारणी ६८०.३ तर चिखलदरा तालुक्यात ९६६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.वरूडमध्ये सर्वाधिक, तर धारणीत सर्वात कमी पाऊसयंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ६७.३ टक्के पावसाची नोंद झाली. म्हणजेच यंदा पावसाची ३३ टक्के तूट आहे. आता पावसाळा संपल्याने येणारा पाऊस हा अवकाळी राहणार आहे. यंदा सर्वाधीक ८५ टक्के पाऊस वरूड तालुक्यात पडला तर सर्वात कमी ५८ टक्के धारणी तालुक्यात पडला. अमरावती ६१.४, भातकुली ५८.६, नांदगाव ६२.५, चांदूररेल्वे ७९.७, धामणगाव रेल्वे ६३.२, तिवसा ७६.५, मोर्शी ७८.८, अचलपूर ६०.३, चांदूरबाजार ७५.१, दर्यापूर ६२.६, अंजनगाव सुर्जी ६२.२ तर चिखलदरा तालुक्यात ६३.३ टक्के पाऊस पडला.
पावसाळा संपला, आता बरसेल तो ‘अवकाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:11 PM
प्रचलित पद्धतीनुसार जिल्ह्यात एक जून ते ३० सप्टेंबर याकालावधीत पावसाळा गृहित धरण्यात येतो.
ठळक मुद्देयंदा ३३ टक्क्यांची तूट : गतवर्षीपेक्षा ४१५ मिमी पाऊस कमी