अमरावती : आमदार रवि राणा यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी केली. शनिवार, ३ जुलै दुपारी १ वाजता हा भुयारी मार्ग नागरिकांच्या सेवेत खुला होणार आहे. भुयारी मार्गाचे काम कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश आमदार रवी राणा यांनी अधिकारी व कंत्राटदाराला दिलेत.
राजापेठ भुयारी मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून हा मार्ग सुरू झाल्यास या परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, गृहिणी आदी सर्वांची कायमस्वरूपी सोय होणार आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांनी या विकासकामाची सखोल पाहणी केली. या भुयारी मार्गात तातडीने विद्युत दिवे, पादचारी जीने, स्टील रेलिंग, फुटपाथ आदी सुविधा आमदार राणा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे राजापेठवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अत्यंत प्राचीन देवी तारामाता मंदिराला धक्का न लावता भाविकांना दर्शनासाठी त्रास होऊ नये, या उद्देशाने विशेष जिना तयार करून मंदिरासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. यावेळी उपायुक्त सुरेश पाटील, शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता सुभाष चव्हाण, मंगेश कडू, श्याम टोपरे, अभियंता शरद तिनखेडे, कंत्राटदार जुजर सैफी, सुनील राणा, नगरसेविका सुमती ढोके, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, अजय मोरया, सचिन भेंडे, अनिल मिश्रा, पराग चिमोटे, अभिजित देशमुख, अवि काळे, नितीन तायडे, गौतम हिरे, सूरज मिश्रा, अमन गोलाइतकर, पंकज बोबडे, सोनू रुंगटा, विनोद येवतीकर, नितीन म्हस्के, दीपक जलतारे, अजय बोबडे, राहुल काळे, शुभम उंबरकर आदी उपस्थित होते.