राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरून अनेका भागात जाणे सोयीचे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ राहते. रेल्वे आवागमनामुळे वाहतुकीला बाधा पोहचत असल्याने नागरिकांनी अंडरपास मार्गाची मागणी लावून धरली होती. ते काम महापालिकेच्या व रेल्वे विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने पूर्ण झाले खरे, मात्र भुयारी मार्गातून जाताना पुढील वाहन दृष्टीस पडत नाही. तसेच उतारातून वाहन हाकताना वेग कमी केल्यास मागे येण्याची शक्यता असल्याने अपघात होत आहे. या मार्गाची निर्मिती नियोजनाअभावी चुकीच्या पद्धतीने झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यास ते बाहेर काढण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारी लागल्या असल्या तरी तांत्रिक कारणांनी त्या बंद पडल्यास ते पाणी कित्येक दिवस तेथे राहणार आहे. त्यात विद्युत संचारल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत. तेथील तांत्रिक चुका महापालिका आयुक्तांच्या लक्षात मुन्ना राठोड यांच्या नेतृत्त्वात स्थानिक नागरिकांनी आणून दिल्या आहेत. मात्र, यावर विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेसह संबंधित विभागाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी भुयारी मार्गाची पूजा करून धरणे देण्याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घेतल्याची माहिती मुन्ना राठोड यांनी दिली. यावेळी सतीश बोरकर, समीर जवंजाळ, योगेश भाकरे, राजेश ठाकूर आदी उपस्थित होते.
राजापेठचा भुयारी मार्ग अपघातप्रवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:16 AM