शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

...तर ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वागतच होईल; डॉ. राजेंद्र गवई यांची स्पष्टोक्ती

By गणेश वासनिक | Published: October 04, 2022 7:23 PM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीतून लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीतून लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या नागपूर येथील दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यक्रमात पाहुण्यांना आमंत्रित करताना कोणताही राजकीय, सामाजिक असा भेदभाव केला जात नाही. त्यामुळे बुधवारी दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होऊ घातलेल्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आल्यास त्यांचे स्वागतच होईल. त्यांच्या लोकप्रियतेबाबत प्रश्नच येत नाही, अशी स्पष्टोक्ती रिपाइंचे (गवई गट) राष्ट्रीय महासचिव तथा दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र गवई यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

नागपूर येथील दीक्षाभूमीवर ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासंदर्भात ते बोलत होते. डॉ. राजेंद्र गवई यांच्या मते, गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वत्रिक धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करता आला नाही. मात्र यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांसह विविध क्षेत्रांतील गणमान्य व्यक्तींना पाहुणे म्हणून बोलावले आहे. तसेच या भव्यदिव्य सोहळ्याला विविध रिपाइंचे नेते, आंबेडकर चळवळीचे प्रमुखांना निमंत्रित केले नाही, याविषयी डॉ. गवई यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होऊ घातलेल्या सोहळ्यात लोकप्रियता बघून आमंत्रित केले जात नाही, तर हा निर्णय दीक्षाभूमी स्मारक समिती घेते. दीक्षाभूमी हे असे स्थळ आहे, जेथे मान, सन्मान, अपमान, अहंकार हा विषय येतच नाही. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे सोहळ्यात आल्यास नक्कीच त्यांचे स्वागत केले जाईल. ते आमच्यासाठी आदरणीय असून, पुढेही राहतील. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा हा कुणाची खासगी प्रापर्टी नाही, असेही डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.

पुढील वर्षी भंते दलाई लामा येणारपुढील वर्षी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला भंते दलाई लामा हे विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार आहे. त्यानुसार स्मारक समिती आतापासूनच तशी तयारी करीत आहे. भंते लामा यांच्यासह आंबेडकर चळवळीत अग्रणी नेते, साहित्यिक, लेखकांना सुद्धा निमंत्रित केले जाईल, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर