लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पाण्याअभावी संत्राबागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मिरचीे या नगदी पिकाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्र्रमाणात असून, तिखट चवीच्या या मिरचीला विदेशात मागणी वाढली आहे. रात्रीतून चालणाऱ्या या एकमेव मिरची बाजारपेठेमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळत आहे.विदर्भाचा कॅलीफोर्निया असलेल्या वरुड तालुक्यात संत्रा पीक धोक्यात आल्याने शेतकºयांनी आता मिरचीकडे आगेकूच करीत मिरचीचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. शेकडो क्विंटल मिरची राजुरा येथील मिरची बाजारात येते. परंतु, कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकºयांना शक्य होत नाही. यामुळे मिळेल त्या भावात विकून शेतकरी मोकळे होतात. रात्री ३ वाजेपर्यंत मिरची देवाणघेवाण करणाºया राजुरा बाजारच्या बाजारपेठतून कोलकाता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्राबादसह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश, दुबई, साऊदी अरब राष्ट्रासह आदी देशात येथील मिरचीला मागणी असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथे परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. बाजारामुळे उपहारगृहे, खानावळी, पानटपरी, चहाटपरीधारकांनाही रोजगार मिळतो. सायंकाळी ६ वाजता ही बाजारपेठ सुरू होते. बाजार समितीला मिळाणारा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. वाहतूकदारांनासुद्धा चांगली संधी मिळते. येथून परप्रांतात मिरची पाठवितांना मंडीमध्ये पोहचण्याचे वेळेचे बंधन असल्याने तीन ते चार हजार वाहतूक करणाऱ्या चालकाला बक्षिसापोटी व्यापाऱ्याकडून दिल्या जाते. अनेकांना काम देणारी बाजारपेठ आहे. एका दिवसाला बाराशे ते सोळाशे क्विंटलपर्यंत मिरचीची आवक या बाजारात असते.उत्पादकांना सुगीचे दिवसया बाजारपेठेत मिनिटागणिक मिरचीच्या भावात चढ-उतार होत असतो. मिरची लावण्यापासून तर मशागत आणि मिरची बाजारात नेईस्तोवर मिरची उत्पादकांना १० ते १२ रुपये प्रतिकिलोमागे खर्च येतो. त्यातुलनेत २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परदेशातील लोकांना तिखट चव देणारी राजुराबाजारची हिरची मिरची शेकडो हातांना काम देणारी ठरत असल्याने मिरची उतपदकांना सुगीचे दिवस आले आहे.शेतकऱ्यांना रोख रक्कममिरची बाजारामध्ये मिरची विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांना शेतमाल मोजल्यांनतर लगेचच रोखरक्कम दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत नाही. यावर्षी चांगले भाव मिळत असल्याने मिरची उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
राजुराच्या मिरचीला परदेशात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:05 PM
पाण्याअभावी संत्राबागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मिरचीे या नगदी पिकाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्र्रमाणात असून, तिखट चवीच्या या मिरचीला विदेशात मागणी वाढली आहे. रात्रीतून चालणाऱ्या या एकमेव मिरची बाजारपेठेमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळत आहे.
ठळक मुद्देनगदी पीक : हजारो मजुरांना रोजगार देणारा मिरची बाजार