आॅनलाईन लोकमतचिखलदरा : तालुक्यातील बोराळा भिलखेडा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागून तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत तीन बकऱ्या ठार झाल्या, तर आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.शुक्रवारी दुपारी बोराळा भिलखेडा येथे जलयुक्त शिवार अंतर्गत ग्रामस्थांची बैठक सुरू असताना सुंदरलाल गंगाराम काळे, रामकिसन चिमोटे, पतिराम धोटे या तीन आदिवासींच्या घरांना अचानक आग लागली. ग्रामस्थांनी अचलपूर येथील अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण नष्ट झाले होते. या तीनही कुटुंबात प्रत्येकी पाच असे एकूण १५ सदस्य राहतात. रामकिसन चिमोटे मजुरीसाठी बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे, सदस्य बन्सी जामकर, सरपंच संजय भासकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.५० हजारांची रोकड जळालीघरामागील बांबूच्या झाडाच्या घर्षणाने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, या आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण, भांडे आणि तिघांच्या घरातील ५० हजारांची रोकड जळाली. सोन्या-चांदीचे दागिनेसुद्धा या आगीत नष्ट झाले. गोठ्यात बांधलेल्या तीन बकºया होरपळून ठार झाल्या. तिन्ही कुटुंब उघड्यावर आल्याने प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी दयाराम काळे यांनी केली आहे.संसार झाला उद्ध्वस्तचिखलदरा तालुक्यात वॉटर कप स्पर्धा अंतर्गत खेड्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या बैठका सुरू आहेत. बोराळा भिलखेडा येथील आदिवासींसोबत प्रशासकीय अधिकारी जलयुक्त शिवार योजनेची बैठक होत असताना, या घराला आग लागली आणि क्षणात त्यांचा आयुष्यभर जमा केलेला संसार उद्ध्वस्त झाला. हा विचित्र योगायोग चर्चेचा विषय ठरला होता.
भिलखेड्यात तीन घराची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:12 PM
तालुक्यातील बोराळा भिलखेडा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागून तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत तीन बकऱ्या ठार झाल्या, तर आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.
ठळक मुद्देकुटुंब उघड्यावर : तीन बकऱ्याही जळाल्या