लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘डेरा सच्चा सौदा’ प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून सोमवारी न्यायालयाने २० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. या घटनेमुळे चार राज्यात हलकल्लोळ माजला आहे. या पार्श्वभूमिवर देशभरातील पोलीस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अमरावती पोलीस आयुक्तालयाला सुद्धा खबरदारी घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाºयांकडून प्राप्त झाले आहेत. ‘डेरा सच्चा’च्या भक्तांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे.बाबा राम रहिम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर शुक्रवारी ‘डेरा सच्चा’च्या समर्थकांनी चार राज्यात प्रचंड हिंसाचार केला. शेकडो वाहने, अनेक रेल्वेस्थानक, पेट्रोलपंप, टेलिफोन एक्सचेंज, प्राप्तीकर कार्यालय, दूध प्रकल्पांना आगी लावल्याने तणावजन्य स्थिती निर्माण झाली. दिल्लीत तर भक्तांनी रेल्वेची बोगीच पेटवून दिली. हिंसाचार शमविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, पाण्याचा मारा करून अश्रूधूर सोडला. मात्र, जमाव पोलिसांच्याच अंगावर धाऊन येत असल्याचे पाहून अखेर ‘डेरा सच्चा’च्या भक्तांवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तब्बल ३० जण ठार झालेत. तर २५० हून अधिक लोक जखमी झाले.राम रहिम दोषी असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यामुळे संतापलेल्या भक्तांनी आक्रमक पाऊल उचलल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. ूबाबा राम रहिमचे भक्त देशभरात विखुरलेले आहेत. त्यामुळे देशाच्या इतर भागातही हिंसाचाराचे लोण पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.यापार्श्वभूमिवर देशभरातील पोलीस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. राज्यभरातील वरिष्ठ पोलिसांनीही याबाबत गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ अधिकाºयांच्या व्हॉटसअॅप समूहाद्वारे राज्यभरातील सर्व पोलीस आयुक्तांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अमरावती पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली असून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरातील पोलीस अधिकाºयांना अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. अमरावती शहरात सुद्धा बाबा राम रहिम यांचे भक्त असण्याची दाट शक्यता दिसून आल्याने वातावरण स्फोटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता तर बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावल्याने वातावरण अधिकच संवेदनशिल झाले आहे.शहरातील काही परिसरात ही भक्त मंडळी असून त्यांच्या रोष उफाळून येण्याची शक्यता पाहता त्या परिसरात पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. खुफीया विभागाला लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.डेरा सच्चा सौदाप्रमुख बाबा राम रहिमला न्यायालयाने दोषी ठरविताच वरिष्ठ अधिकाºयांनी अलर्ट राहण्याचे आदेश दिले. अमरावतीत डेरा सच्चा समर्थकांची संख्या कमी आहे. मात्र, शहरात खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त.
‘राम रहीम’प्रकरण अमरावतीतही ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:08 PM
‘डेरा सच्चा सौदा’ प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून सोमवारी न्यायालयाने २० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
ठळक मुद्देसमर्थकांवर करडी नजर : वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाने अंमलबजावणी