शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

रमाई घरकूल योजनेला कासवगती

By admin | Published: April 17, 2015 11:59 PM

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेली रमाई आवास योजना राबविताना ...

आॅनलाईन तरीही मरगळ : धनादेश, बीपीएल प्रमाणपत्रासाठी पायपीट सुरुचअमरावती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेली रमाई आवास योजना राबविताना महापालिकेत कासवगतीने काम सुरुआहे. परिणामी घरकुलांसाठी अनुदान आले असतानादेखील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याची ओरड कायम आहे. काही दिवसांपूर्वी ही योजना आॅनलाईन सुरु करण्यात आली असून प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी मरगळ झटकली नसल्याचे चित्र आहे.शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांसाठी शासनाने ९ मार्च २०१० रोजी अध्यादेश काढून या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. घरकुलासाठी २६९ चौरस फूट चटई क्षेत्र निश्चित करुन दोन लाख रुपये किंमत देण्याचे ठरविण्यात आले. यात बीपीएल लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा भरण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. ही योजना व्यवस्थितरीत्या सुरु राहावी, यासाठी तांत्रिक कामांसाठी महापालिकेने पुणे येथील पेव्हटेक कन्सल्टक कंपनीला जबाबदारी सोपविली आहे. शहरात घरकूल योजनेंतर्गत १९८५ घरे मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार दोन टप्प्यात १४४५ घरकूल निर्माण करुन ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. त्यापैकी ५४० घरकूल निर्माण करावयाची आहेत. रमाई घरकूल योजनेचे स्वतंत्र कामकाज चालविण्यासाठी महापालिकेत दलित वस्ती विभाग कार्यरत आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंते, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असताना रमाई घरकूल योजनतील ओरड कमी होण्याचे नाव घेत नाही, ही चिंतनीय बाब आहे. फेबु्रवारीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, भूषण बनसोड, अजय गोंडाणे, अंबादास जावरे, निर्मला बोरकर, दीपमाला मोहोड, गुंफाबाई मेश्राम, अलका सरदार, अविनाश मार्डीकर, जयश्री मोरे, कांचन ग्रेसपुंजे आदी सदस्यांनी ही योजना व्यवस्थितरीत्या राबविली जात नसल्याचा आरोप केला. परिणामी मावळते आयुक्त अरुण डोंगरे यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते रमाई घरकूल योजना ही आॅनलाईन सुरु करुन होणारी ओरड कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ही योजना आॅनलाईन सुरु झाल्यानंतरदेखील लाभार्थ्यांना कोणत्यातरी कारणास्तव पायपीट करावीच लागत आहे. घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळेल ही आशा असताना कासवगतीने सुरु असलेल्या कामांमुळे अनेकांना वेळेत लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ही योजना आॅनलाईन सुरु करण्यापूर्वी अनेक लाभार्थ्यांच्या फाईली गायब झाल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. एकदा फाईल गायब झाली की, ती पुन्हा तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पैशांचा भुर्दंड हा लाभार्थ्यांना सहन करावा लागत होता. आॅनलाईनमुळे लाभार्थ्यांची फाईल गायब होण्याची भानगड थांबली असली तरी जलदगतीने लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर न होता धनादेश, बीपीएलचे प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड कायम आहे. (प्रतिनिधी)४०० घरकुलांचा नव्याने प्रस्तावशहरात ५४० घरकू ल निर्माण करावयाची असली तरी नव्याने ४०० घरकूल निर्माण करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ८ कोटी रुपये त्याकरिता अपेक्षित असल्याची माहिती उपअभियंता भास्कर तिरपुडे यांनी दिली. ही योजना आॅनलाईन सुरु झाल्यापासून लाभार्थ्यांची ओरड कमी झाली आहे. शासन निर्णयानुसारच प्रशासनाला कामे करावी लागत असून नियमाबाहेर काहीही करता येत नाही. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचे तिरपुडे यांनी सांगितले.योजनेसाठी लागणारी कागदपत्रेरमाई घरकूल योजनेसाठी एकूण ११ प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. यात महापालिका बीपीएल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, टॅक्स पावती, असिसमेंट पावती, १०० रुपयांचे मुद्रांक, मतदान कार्ड, बॅकेचे पासबूक, महापालिका रहिवासी दाखला, नगरसेवकाचा दाखला, शिधापत्रिका यांचा समावेश आहे.