अमरावती : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांना त्वरित अटक करा व त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी विदर्भ लहूजी सेनेने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्या कारकिर्दीत महामंडळामध्ये सुमारे ३८५ कोटी रूपयांचा अपहार झाला आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश कदम हेच जबाबदार असल्याचा आरोप विदर्भ लहूजी सेनेने या निवेदनाव्दारे केला आहे. महामंडळातील पदोन्नतीतसुध्दा अनियमितता झाली आहे. कदम यांनी स्वत:चे नातेवाईक व संस्थांना निधी वाटप करून अनियमितता केली आहे. मातंग समाजाच्या उन्नतीसाठी कोटयावधी रूपयांचा निधी या समाजातील बेरोजगार युवक व समाज बांधवाना मिळाला नाही. त्यामुळे याला दोषी असणारे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष कदम यांना अटक करून त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी विदर्भ लहूजी सेनेचे अध्यक्ष महादेव खंडारे, रूपेश खडसे, पकंज जाधव श्रीराम हंगरे, अशोक खंडारे, कैलास स्वर्गे, विजय थोरात, अशोक डोंगरे, दिलीप आमटे, राजू कलाने यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
रमेश कदम यांना अटक करा
By admin | Published: June 19, 2015 12:35 AM