फोटो - मोहन २९ पी
धामणगाव रेल्वे : संस्कार भारतीच्या धामणगाव रेल्वे शाखेच्यावतीने नुकतेच नटराज पूजन व सत्कार सोहळा टिळक चौकातील श्री मारुती मंदिर संस्थानचे सभागृहात पार पडला. गुरुपौर्णिमेला ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान अंतर्गत सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते रमेश साखरकर (रा. भिल्ली) यांना भारतीने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर विदर्भ प्रांत सहसंघचालक चंद्रशेखर राठी, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विठ्ठल काठोळे, सत्कारमूर्ती रमेश साखरकर, सुशीला साखरकर, संस्कार भारतीच्या स्थानिक अध्यक्ष प्रीती कोठारी उपस्थित होत्या. संस्कार भारतीचे ध्येयगीत सचिव गजानन उपरीकर यांनी गायिले.
सेंद्रिय शेतीतील सूक्ष्म संशोधन, कृषिक्षेत्रातील जागतिक स्तरावरील महत्तम योगदान याबाबत सत्कारमूर्ती रमेश साखरकर यांचा शाल-श्रीफळ व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्मिता सामुद्रे यांनी मानपत्राचे वाचन केले. संचालन संस्थेचे सहसचिव विशाल मोकाशे यांनी केले. संस्थेचे साहित्य विधाप्रमुख रवि चौधरी यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनुपमा देशकर, दत्तात्रय सराफ, प्रकाश राऊतकर, सुरेंद्रसिंह ठाकूर, प्रफुल्ल महल्ले, प्रवीण पोतदार, यशवंत पाटील, चेतन कोठारी, पांडुरंग सामुद्रे, मंदिराचे विश्वस्त कीर्तने, संजय देशकर, प्रवीण दाऊतपुरे, ओंकार उंदरे, अरुणा राऊतकर, शिल्पा देशपांडे, प्रीती चिरडे, मंदिराचे पुजारी गाडे, लेखा कोठारी उपस्थित होते.