शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

रमो रमा रे होळी, रो त्योहार होळी रमलो रे...

By admin | Published: March 24, 2016 12:32 AM

बंजारा समाज आणि होळी यांचे अतुट नाते आहे. काळानुरुप सण साजरी करण्याची पध्दत सगळीकडेच बदलली असली ...

बंजारा तांड्यावर धूम : परंपरांची आजही होतेय जपणूक, ढोलकीच्या तालावर गीतांचा नाद तिवसा : बंजारा समाज आणि होळी यांचे अतुट नाते आहे. काळानुरुप सण साजरी करण्याची पध्दत सगळीकडेच बदलली असली तरी बंजारा समाजाने मात्र अजूनही ही परंपरा जपली आहे. विशेष म्हणजे होळी आणि धुळवडीच्या सणानिमित्ताने बंजारा तांड्यांवर धूम सुरू झाली आहे. बंजारा समाजात होळीला फार महत्त्व आहे. सणाची तयारी एक आठवड्यापासून सुरु होते. ‘रमो रमोरे होळी, रो त्योहार होळी रमलोर..’ अशी लेहंगी गीते दररोज गायली जातात. प्रत्येक तांड्यावर जगदंब देवीचे मंदिर असते. या मंदिरासमोर पारंपारिक लेहंगी गीते गायली जातात. लाठ्या-काठ्यांचे प्रात्याक्षिक दाखविले जाते. त्यानंतर तांड्याचा प्रमुख असणाऱ्या नायकाच्या घरासमोरही लाठ्या-काठ्यांचे प्रात्याक्षिक केले जाते. रंगपंचमीला बंजारा तांड्यातील स्त्री-पुरुष, आबालवृध्द, गरीब-श्रीमंत एकत्र येऊन जल्लोष साजरा करतात. एकमेकांच्या अंगावर मनसोक्त रंग उडवून बंजारा बोलीभाषेतील खास धुळवडीची गीते गायली जातात. मद्य आणि मटणाचाच प्रामुख्याने बेत असतो. सामूहिक होळी साजरी करण्याची परंपरा बंजारा तांड्यांमधून आजही कायम असल्याचे दिसते. अलिकडच्या काळात शहरात वास्तव्यास असणाऱ्या बंजारा बांधवांमध्ये सामूहिक परंतु पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तांड्यावर राहणाऱ्या बांधवांमध्ये आजही ही प्रथा जपली जात आहे. होळी व धूळवड म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच आहे. बंजारा समाजात या उत्सवाची धूम सुरू झाली आहे. फगवा हा प्रकारही बंजारा समाजात बराच लोकप्रिय आहे. फगवा मागताना देखील विविध गीते गायली जातात. एकूण बंजारा समाजाची आगळी होळी साजरी होत आहे. (प्रतिनिधी)रंग खेळा पण जरा जपून!अमरावती : होळी उत्सवाला विजेच्या अपघाताचे गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग उडविताना होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. रंगपंचमी साजरी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी होलिकादहन पार पडल्यानंतर गुरूवारी रंगोत्सव साजरा केला जातो. मात्र, हा उत्सव मनसोक्त साजरा करताना विजवाहिनीच्या किंवा वितरण रोहित्र नसलेल्या ठिकाणी साजरा करावा. बरेचदा वीज प्रवाह असलेल्या ठिकाणी रंग उडविले जातात. अशावेळी पाण्याचे फवारे वीज वाहिनीवर उडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. रंगांचे फुगे फेकताना ते विद्युत खांब आणि वीज वाहिन्यांना लागणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असेही विद्युत विभागाने कळविले आहे. वितरण यंत्रणेचे रोहित्र व तत्सम उपकरणे असलेल्या जागेपासून लांब अंतरावर रंग उडवावेत. ओल्या हाताने विद्युत खांबाना स्पर्श करू नये, विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. होळी व रंगपंचमीचा सण आनंदाचा आहे. त्यामुळे या आनंदात कोणतेही विघ्न येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही विद्युत विभागाने केले आहे. धुळवडीवर पोलीसांची नजर अमरावती : धूलिवंदनाला कुठल्याही अप्रिय घटनचे गालबोट लागू नये, यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणांवर गस्तीवर भर दिला जाणार आहे. गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या धुळवडीवर पोलिसांची सूक्ष्म नजर असेल. रंगपंचमीला तरुणाईमध्ये मस्तीचा ज्वर उफाळतो. प्रसंगी मद्य रिचवून धूम स्टाईल बाईक पिटाळल्या जातात. रंग फासून शहरभर हुडदंग घातला जातो. त्यामुळे होळी, धूळवड साजरी करा, मात्र कायद्याच्या चौकटीत राहून, असे आवाहनच पोलिसांनी केले आहे. ४शहर पोलिसांनी होळी, रंगपंचमी व त्यापुढे शिवजयंतीसाठी कलम १४४/१ अन्वये आदेश काढले आहे. कलम १८८ अन्वये कारवाई ४२३ मार्चपासून सकाळी ८ ते २८ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कलम १४४/१ अन्वये आदेश काढण्यात आला. आदेशांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी दंडसंहिता १८६० चे कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.