प्रशासक नेमण्याचा प्रस्तावफसवणूक प्रकरण : घरकुलाचे स्वप्न बघणाऱ्यांना दिलासाअमरावती : आर्थिक गुन्हे शाखेने राणा लॅन्डमार्कच्या संचालकांची १८ कोटींची संपत्ती जप्त केली असून आता ही संपत्ती फसवणूक झालेल्या नागरिकांना परत करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पोलिसांनी गृहविभागापर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ‘राणा लॅन्डमार्क’ ने २७७ गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेला याबाबत २७७ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर राणा लॅन्डमार्ककडून १० कोटींनी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी योगेश नारायण राणा, चंद्रशेखर राणा व त्यांचा मॅनेजर शशिकांत निरंजन जिचकारविरूध्द गुन्हे नोंदविले. आरोपींना अटक करुन १७ कोटी ८६ लाख ४८ हजार ७६६ रुपयांची स्थावर संपत्ती जप्त करून नऊ बँकांच्या खात्यांमधील ५२ हजार ८६६ रुपयांची रोख सुध्दा जप्त केली आहे. पैसे परत करण्यासाठीशासकीय प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव ८ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडूनही १२ जून रोजी गृहविभागाकडे प्रस्ताव पाठविला.फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे परत करण्यासाठी प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. तसे झाल्यास नागरिकांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरु होईल. राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. -गणेश अणे, पोलीस निरीक्षक
‘राणा लॅन्डमार्क’वर
By admin | Published: June 18, 2015 12:14 AM