शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

राणा समर्थकांचा भाजप कार्यालयावर हल्ला

By admin | Published: April 16, 2016 11:59 PM

‘पालकमंत्र्यांच्या बैलाला पो’ अशी तुफान नारेबाजी करीत राणा आणि समर्थक राजापेठ पोलीस ठाण्यातून बडनेरा मार्गाने कूच करीत असताना...

अमरावती : ‘पालकमंत्र्यांच्या बैलाला पो’ अशी तुफान नारेबाजी करीत राणा आणि समर्थक राजापेठ पोलीस ठाण्यातून बडनेरा मार्गाने कूच करीत असताना काही मीटर अंतरावरील भाजपच्या विभागीय कार्यालयावर राणा समर्थकांनी हल्ला केला. पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हा हल्ला झाला, हे उल्लेखनीय. भाजप कार्यालयाबाहेर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे फ्लेक्स राणा समर्थकांनी फाडून फेकले. कार्यालयाच्या तावदानांवर गोटमार केली, काचा फोडल्या. पुढे गद्रे चौकात या जमावाने एसटी बसच्या काचा फोडल्या.आ. रवी राणा यांच्या समर्थकांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाजपच्या सात पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा रात्री ११ वाजता राजापेठ पोलिसांनी नोंदविला. दिवसभर ठिय्या मांडून बसलेले आ. राणा त्यानंतर समर्थकांसह पोलीस ठाण्यातून रवाना झाले. त्यावेळी ही घटना घडली. नारेबाजी करीत राणांच्या नेतृत्वातील हा जत्था राणा यांच्या निवासस्थानाकडे वळता झाला. घटना वाऱ्यासारखी पसरली. मध्यरात्रीपर्यंत मोठी गर्दी भाजप कार्यालयासमोर एकत्रित झाली. दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हा जमाव राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला. कार्यालयावरील हल्ल्याची तक्रार मध्यरात्रीनंतर राजापेठ पोलिसात नोंदविली.विवेक कलोती आयसीयूमध्ये राणा यांच्या कार्यालयात शिरलेल्या भाजपजनांमध्ये विवेक कलोती या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षांचा समावेश होता. राणा समर्थकांनी दिलेल्या हिंसक प्रत्त्युत्तरात कलोती यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. रात्री ११ च्या सुमारास कलोती यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष दक्षता विभागात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदविले. वृत्त लिहिस्तोवर ते आयसीयूमध्येच होते. हा तर पोलिसांचा भ्याडपणा : राणाभाजप पदाधिकाऱ्यांनी माझ्या कार्यालयात हल्ला केला त्यावेळी वर्दीतील पोलिसांना धक्काबुक्की केली. कॉलर पकडली. डिसीपी नितीन पवार, सीपी दत्तात्रेय मंडलिक यांना याबाबत मी अवगत केले. व्हिडिओदेखील उपलब्ध आहे. पोलिसांनी तरीही धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले नाही. पोलीस भ्याड आहेत, अशी प्रतिक्रिया आ. राणा यांनी दिली.