पत्रपरिषद : दिनेश सूर्यवंशी यांचा आरोपअमरावती : ‘आम्ही नि:शस्त्र होतो. हल्ला करण्याचा उद्देश असता तर किमान काठ्या नेल्या असत्या. परंतु आम्ही लोकशाही मार्गाने केवळ निषेध नोंदविण्यासाठी आणि आ. राणांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो. हल्ल्याची सुरूवात राणा समर्थकांकडूनच झाली’, असा आरोेप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रपरिषदेतून केला. पुढे बोलताना ते म्हणाले, राणा समर्थकांनी खुर्ची मारून भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष विवेक कलोती यांचे डोके फोडले. त्यामुळेच आमचे कार्यकर्ते बिथरले आणि हाणामारीला सुरूवात झाली.आ. राणा यांनी भीमटेकडीवरील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या पुतळा अनावरणाच्या मुद्यावरुन मुद्दामच पालकमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा वापरली. वास्तविक या प्रकरणाशी पालकमंत्र्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही. कला संचालनालयाने पुतळ्याच्या बनावटीवर आक्षेप नोंदविला होता. निळ्या झेंड्यांची गरज काय?अमरावती : आक्षेप नोंदविणारी मंडळी भाजपची नाही. नियमांची पूर्तता करण्याऐवजी राणा यांनी त्या मुद्याचा जाणीवपूर्वक राजकीय वापर केला. त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनाच ‘टार्गेट’ केले.आ. रवि राणा यांची आजवरची कारकीर्द बघता ते नेहमीच चुकीच्या मुद्यांचा बाऊ करतात. नौटंकी करणे हा त्यांचा स्वभाव आहे. कायदेमंडळाच्या सभागृहाचे सदस्य असलेल्या व्यक्तिला वागणुकीचे किमान भान तरी असायलाच हवे. बाबासाहेबांच्या अस्थी असलेल्या नया अकोला येथील स्मृतीस्थळी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना सन्मानपूर्वक मंचावर बोलावले गेले. भगवे आणि निळे फेटे एकत्र आल्याचे सुंदर चित्र या शहरात असताना राणांनी निळे झेंडे घेऊन लोकांना कशासाठी बोलावले? कार्यकर्त्यांना बोलावून काय ते सांगता आले असते. घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज होती काय? आम्हालाही पक्षाचे झेंडे हाती घेता आले असते; पण आम्ही तसे केले नाही, असेही सूर्यवंशी म्हणाले.
राणा समर्थकांकडूनच हल्ला
By admin | Published: April 16, 2016 12:04 AM