लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आ.रवि राणा आणि युवा स्वाभिमानला जशास तसे उत्तर देण्याची क्षमता शिवसेनेत आहे. मात्र नवरात्रीच्या पावनपर्वावर शिवसेना जिल्ह्यातील राजकारण नासवू इच्छित नाही. त्यामुळे पोलिसांनी राणा व त्यांच्या पिलावळीविरुद्ध उचित कारवाई करावी, राणांची ही नौटंकी भाजपला गोंजारण्याची निष्फळ खेळी असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय बंड यांनी केला.युवा स्वाभिमान संघटनेने रविवारी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केल्याच्या पार्श्वभूमिवर सोमवारी शिवसेनेच्या जिल्हा तथा शहर पदाधिकाºयांनी पत्रपरिषद घेऊन राणा यांना नौटंकीबाज संबोधले. नवनित राणा यांचे जात प्रमाणपत्र वाचविण्यासाठी आ.राणा यांची धडपड असून केवळ प्रसिद्धीसाठी राणांनी शिवसेनेला शिंगावर घेतल्याचा आरोप बंड यांनी केला. उध्दव ठाकरे व शिवसेनेवरील टीका व आरोप सहन करून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला. शिवसेनेबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध सायबर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पत्रकारपरिषदेत करण्यात आली. सुरुवातीला युवा स्वाभिमान व राणा यांचे नाव टाळण्याचा प्रयत्न करणाºया शिवसेना पदाधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर सर्वच पदाधिकाºयांनी राणा यांचे नाव घेऊन त्यांना धडा शिकविण्याची क्षमता शिवसेनेत असल्याचा दावा केला. युवासेनेचे पदाधिकारी यावेळी अधिक आक्रमक दिसले. राणा यांना त्यांची जागा दाखविण्याचा दम युवासेनेचे पराग गुडधे यांनी भरला. राणा २२ आमदार फुटण्याची भाषा करतात, त्यांनी केवळ दोन आमदारांची नावे सांगावी, असे प्रतिआव्हान शिवसेनेकडून देण्यात आले. पत्रपरिषदेला संजय बंड यांच्यासह जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, महानगरप्रमुख सुनील खराटे, पराग गुडधे, नाना नागमोते आदींची उपस्थिती होती. नवनित राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा पत्रपरिषदेत करण्यात आला.
भाजपला गोंजारण्यासाठी राणांची नौटंकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:58 PM
आ.रवि राणा आणि युवा स्वाभिमानला जशास तसे उत्तर देण्याची क्षमता शिवसेनेत आहे.
ठळक मुद्देशिवसेनेची पत्रपरिषद : जशास तसे उत्तर देण्याची क्षमता