लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बीएसएनएलची सेवा जुळ्या शहरांसह मेळघाटात चार महिन्यांपासून पूर्णत: ढेपाळल्याने नागरिकांना रेंज शोधत पाण्याच्या टाकीवर, गावाच्या वेशीवर, तर कुठे उंच टेकड्यांवर चढून संभाषण करावे लागत आहे. मंगळवारी सायंकाळी बंद झालेली सेवा बुधवारी १२ तासांनंतर सुरू झाली.मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यासह अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ४० व १०० मीटरचे टॉवर उभारण्यात आले आहेत. शहरी भागांप्रमाणेच मेळघाटातील आदिवासींमध्येसुद्धा दैनंदिन गरजांसह रोजंदारीची कामे करण्यासाठी मोबाईलवर संभाषण आवश्यक झाले आहे. खासगी कंपन्यांपेक्षा आजही मेळघाटसह शहरी भागात इंटरनेट सेवेसाठी शेतकरी, नागरिक बीएसएनएलला पसंती देतात. परंतु, सतत विविध कारणांनी टॉवर बंद राहण्याच्या तक्रारी आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्त्यांच्या कामात जेसीबीने वायर तोडल्याचे एकमेव उत्तर असते. मंगळवारी सायंकाळी बंद झालेले बीएसएनएलचे टॉवर बुधवारी १२ ते १४ तासांनंतर सुरू झाले. परतवाडा शहरातील अनेक भागांप्रमाणे मिल कॉलनी परिसरात संभाषण करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर येऊन बोलावे लागते. मेळघाटात टू-जी सेवा सतत खंडित राहण्याचा आता विक्रम झाला आहे.रेंजच्या शोधात माकड उड्यामेळघाटात मोबाईलची रेंज मिळावी, यासाठी झाडावर, पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर, भिंतीवर, गावाच्या शिवारावर, उंच टेकडीवर नागरिक फिरत असल्याचे दृश्य जेवढे मजेशीर, तेवढे संतापजनक आहे. तंत्रज्ञान प्रगत होत असले तरी सेमाडोह, काटकुंभ, चुरणीसह धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये माकड उड्यांचा हा प्रयोग होतो. दुसरीकडे मेळघाटात ऑनलाइन शिक्षणही दिवास्वप्न ठरले आहे.चांदूर बाजार ते परतवाडा दरम्यान केबल तुटल्याने सेवा खंडित झाली होती. मेळघाटातील काटकुंभचा परिसर हा मध्य प्रदेशातून असल्याने त्यासंदर्भात काम सुरू आहे. टू-जी सेवेबाबत अधिक दक्षता घेण्यात येईल.- सुनील अग्रवाल, जनरल मॅनेजर, बीएसएनएल, अमरावती
रेंज शोधत टाकी, टेकड्यांवरून संभाषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 5:00 AM
मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यासह अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ४० व १०० मीटरचे टॉवर उभारण्यात आले आहेत. शहरी भागांप्रमाणेच मेळघाटातील आदिवासींमध्येसुद्धा दैनंदिन गरजांसह रोजंदारीची कामे करण्यासाठी मोबाईलवर संभाषण आवश्यक झाले आहे. खासगी कंपन्यांपेक्षा आजही मेळघाटसह शहरी भागात इंटरनेट सेवेसाठी शेतकरी, नागरिक बीएसएनएलला पसंती देतात.
ठळक मुद्देसंताप : जुळ्या शहरांसह मेळघाटात बीएसएनएलची सेवा ढेपाळली