शहरं
Join us  
Trending Stories
1
ICICI बँकेत खळबळ, जीएसटी विभागाचा बुधवारपासून छापा सुरूच; शेअरवर मोठा परिणाम होणार
2
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
3
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
4
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
5
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
6
कुर्यात सदा मंगलम! नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला अडकले लग्नबंधनात; विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो व्हायरल
7
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
8
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
9
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
10
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
11
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
12
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
13
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
14
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
15
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
16
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
17
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
18
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
19
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
20
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या

महिलादिनी एकवटल्या रणरागिणी

By admin | Published: March 09, 2017 12:12 AM

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमुळे महिला शक्ती एकत्र आली होती.

दुचाकी रॅली : शहरवासीयांचे वेधले लक्षअमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमुळे महिला शक्ती एकत्र आली होती. या रॅलीने दुचाकीवर फेटे घालून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.जागतिक महिला दिनाचे निमित्त महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस पुरस्कार, टीएचआर पाककृती स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, आदिवासी नृत्य, स्वर गुंजन अशा विविध कार्यक्रमांमुळे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या विविध उपक्रमांर्तगत जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील १४ अंगणवाडी प्रकल्पाच्यावतीने बालक आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या माध्यमातून पाककृती स्पर्धेत विविध प्रकारची पाककृती साकारण्यात आली होती. याशिवाय पुष्प प्रदर्शनी, मेळघाटातील आदिवासी महिलांनी सादर केलेले गादली आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, सीईओ किरण कुलकर्णी महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, उषा गित्ते राजश्री कुलकर्णी, वनश्री वारे, ज्योसना ठाकरे यांच्यासह सदस्या संगीता सवई, रंजना उईके, संगीता चक्रे, वनमाला खडके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी कैलाश घोडके आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आदर्श अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्काराने २८ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात आले. याशिवाय महिला बालकल्याण विभागाचे निवड बालविकास अधिकारील विस्तार अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांचा उत्कृ ष्ट कार्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेप्युटी सीईओ कैलाश घोडके, तर संचालन क्षीप्रा मानकर हिने केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका सहभागी होत्या. (प्रतिनिधी)आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्काराचे मानकरी प्रिती इंगळे, बेबी तलवारे, हिरू पेठे, रंजना रौराळे, शेबनी राऊत, मेघा बनारसे, मालिनी इरखेडे, दीपाली पुसदकर, सुषमा चौकडे, रुपाली थोरात, संगीता बेंदरे, रत्नमाला नेवासकर, संध्या खातरकर, खातरकर, साधना ठोकळ, अर्चना सालोडे, शोभा पानसे, भारती धवे, विमल वसू, स्वाती लहाने, स्मिता पिसे, सरला शिंगणे, मिना अढावू, रंजना देशमुख, उज्वला वाठोडकर, मंदा जावरकर, भागीरथी आडे, शितल काळबांडे, सुकरई सावलकर यांचा समावेश आहे.महिलांनी धरला तालजागतिक महिला दिनानिमित्त स्वर गुंजन कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित स्वर गुंजन कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला कर्मचाऱ्यांनी मराठी गाण्यावर ताल धरत नाचण्याचा आनंदही व्दिगुणित केला.