(फोटो)
अमरावती : शासनाने कडक निर्बंध असतानाही बरेच नागरिक शहरात विनाकारण गर्दी करताना दिसून येत आहेत. काही व्यापारी छुप्या पद्धतीने व्यवसाय करताना आढळून येत आहे. अशा नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करायला सुरुवात केली असून, या चाचणीत कोरोना पाॅझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे.
महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निर्देशावरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी महानगरपालिकाद्वारे शनिवारी इतवारा चौक येथे अकारण फिरणाऱ्या ९९ नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्यात आली. रविवारी गांधी चौक व पंचवटी चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त योगेश पिठे, डॉ. संदीप पाटबागे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, सहायक क्षेत्रीय अधिकारी संजय गंगात्रे, जितू श्रीवास्तव, अभियंता प्रदीप वानखडे, सचिन मांडवे, मनोज शहाळे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक एस. ए. शेख, विजय बुरे, विक्की जैदे, स्वास्थ्य निरीक्षक धनीराम कलोसे, प्रशांत गावनेर, मनीष हडाले, प्रीती दाभाडे, जीवन राठोड, धर्मेद डिके, मनीष नकवाल, सैयद हक, शेख आवेश, प्रवीण भेंडे, रोहित हडाले, परीक्षित गोरले, राजेश उसरे, झोन नंबर १ चे चंद्रकांत देशमुख, अनिकेत मिश्रा, संजय पातुर्डेकर, दीपक सरसे, नवरंग चव्हाण, डी.के. चव्हाण व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
आतापर्यंतच्या चाचणीत १० पॉझिटिव्हची नोंद
गांधी चौकात ४९ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये एका नागरिकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. पंचवटी येथे ११९ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन नागरिकांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. याशिवाय दोन दिवस झालेल्या चाचण्यांमध्ये सहा पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.