आॅनलाईन लोकमतअमरावती : अतिशय विषारी अशा पोवळा सापाची नोंद सर्पमित्रांनी अमरावती जिल्ह्यात घेतली आहे. दर्यापूर तालुक्यातील मांजुरडा या छोट्याशा गावात या सापाचे प्राण वाचवून सर्पमित्रांनी त्याला नजीकच्या जंगलात सोडले.दर्यापूर तालुक्यातील गौरखेडा नजीकच्या मांजुरडा या गावात साप निघाला. काही जागरूक नागरिकांनी त्याला ठार करण्याऐवजी सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्र तुषार इंगोले यांनी सापावर लक्ष ठेवा, मात्र त्याला मारू नका, असे फोनवर सांगून ३० किलोमीटरवरील मांजुरडा गाठले. यानंतर सापाला पकडले. तो जहाल विषारी अशा पोवळा या अतिशय दुर्मीळ जातीचा होता.
शेपटीची गुंडाळी
हा साप भीती दाखविण्यासाठी शेपटी गोल करून तांबूस-नारिंगी भाग दर्शवितो. त्याची लांबी ही सरासरी १४ इंच असते.रंगसंगतीचा अनोखा मेळपोवळा सापाचे शास्त्रीय नाव येट्राफाय फॉलिओफीस मेलेनुरूस आहे. लांबट-सडपातळ शरीर, शेपूट आखूड, डोक्यावर दोन पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि शेपटीखालील गुदद्वारापासून टोकापर्यंत त्वचा आकाशी रंगाची व त्यावर काळे ठिपके असतात.सापांना मारू नकातुषार इंगोले, चेतन अडोकार, अभिजित दाणी, मंगेश तवाळे, राम पावडे, ऋषी देशमुख आदी सर्पमित्र १० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. साप कुठलाही असो, त्याला मारू नका, सर्पमित्राला सूचना द्या, असे आवाहन ते करतात.