-----------------------
कोरोनामुळे अन्य जिल्ह्यांतील १६८ रुग्णांचा मृत्यू
अमरावती : अन्य जिल्ह्यातून उपचारार्थ दाखल झालेल्या १६८ संक्रमितांचा आतापर्यंत मृत्यू झाला. जिल्हा सीमेलगतच्या मध्य प्रदेश व नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यांतील संसर्गाचे गंभीर रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारार्थ दाखल होते.
-------------------------
कोरोना मृत्यूच्या प्रमाणात काहीअंशी वाढ
(कोरोना फोटो)
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमण व उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली. परिणामी १.३१ टक्क्यांवर असलेला मृत्युदर आता १.५१ टक्क्यांवर पोहोचला. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्युसंख्येत वाढ झाली आहे.
--------------------------------
संचारबंदीत मनाई असलेली दुकाने सुरू
अमरावती : जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक व जीवनावश्यक दुकाने विहीत कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र, अंतर्गत भागातील अन्य काही दुकानेदेखील या कालावधीत सुरू झाल्याचे दिसून आले.
-----------------------------
शिवारांमध्ये मशागतीची लगबग
अमरावती : जिल्ह्यात आठ दिवसांत हवामान बदलांमुळे बहुतेक भागात पाऊस कोसळला. त्यामुळे खरिप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी शिवारात आता लगबग सुरू झाल्याचे दिसून येते. उन्हामुळे शेतकरी पहाटेच कामाकरिता जात आहेत.
------------------------
शहरात संसर्ग कमी, ग्रामीणमध्ये जास्त
अमरावती : जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपासून महापालिका क्षेत्रातील संसर्ग माघारला आहे. याउलट ग्रामीण भागात वाढला आहे. सद्यस्थितीत शहरातील होम आयसोलेशनमध्ये १८१५ व ग्रामीण भागात ६,६५१ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.