शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

रॅश ड्रायव्हिंग सुसाट

By admin | Published: December 27, 2015 12:24 AM

दस्तुरखुद्द पोलीस उपायुक्तांच्या वाहनासमोर रॅश ड्रायव्हिंगचा प्रकार उघड झाल्याने बाईकर्सच्या वेग व ‘धूम’ स्टाईलला ...

स्टंटबाजांना रोखणार कोण? : वर्षात १५ हजार राँग साईडअमरावती : दस्तुरखुद्द पोलीस उपायुक्तांच्या वाहनासमोर रॅश ड्रायव्हिंगचा प्रकार उघड झाल्याने बाईकर्सच्या वेग व ‘धूम’ स्टाईलला आवर घालणार कोण, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. लाख-दीड लाखांची बाईक घेऊन, मागे ‘गर्लफ्रेंड’ला बसवून वर्दळीच्या मार्गावरून जाताना दुचाकीस्वारांचा बेदरकारपणा वाढला आहे. यात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शॉर्टकटचा मार्ग अनेक बाईकर्स पत्करण्यामुळे अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे. २१ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे हे कॅम्प भागातून जाताना त्यांच्या वाहनासमोरच दोन अल्पवयीन मुलांनी अतिशय बेदरकरपणे ड्रायव्हिंग केली. भरधाव वेगाने दुचाकी हाकणाऱ्या त्या दोघांना उपायुक्तांनी थांबविले असता त्यांच्याजवळ दुचाकीचे कागदपत्रे आणि परवानाही आढळून आला नाही. सरतेशेवटी त्या दोन्ही संघर्षित बालकाविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पालकांसमोर त्यांना समज देण्यात आली. हे प्रकार दिवसेंदिवस शहरातील प्रत्येक रस्त्यांवर पहावयास मिळत आहे. अगदी वेगाने कट मारून जाताना हे बाईकर्स स्वत:सह दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी किमान महाविद्यालय व गजबजलेल्या रस्त्यांवर या बाईकर्सवर पोलिसी कारवाईची गरज निर्माण झाली आहे. 

आयुक्तालयासमोर राँग साईडपोलीस आयुक्तालयासमोरूनही राजरोसपणे रांगसाईड वाहने हाकली जातात. पोलीस आयुक्तालय, अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयातून निघणारे बहुतांश दुचाकीस्वार फारसे श्रम न घेता रिझर्व्ह लाईनकडे राँग साईडने कूच करताना आढळून येतात, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)वन-वे वर धूम स्टाईलगाडगेनगर ते पंचवटी व पुढे शिवाजी सोसायटी आणि शिवाजी महाविद्यालयासमोर उतरणारा उड्डाणपूल वन-वे आहे. मात्र अनेक तरूण नियमांच्या चिंधड्या उडवीत शिवाजी कॉलेजसमोरून राँगसाईडने दुचाकी दामटून गाडगेनगरमध्ये विरुद्ध दिशेने जातात. यात अनेकदा अपघातही झाले आहेत. राँग साईडने चालणारे हे बाईकर्स वेगाची मर्यादा पाळत नाही. या सुसाट बाईकर्सचा त्रास नियम पाळणाऱ्या वाहनचालकांनाही होत आहे.राँगसाईडर्स अधिकपोलीस मुख्यालय चौकात पेट्रोलपंपानजीक वाहतूक पोलीस उभे राहत असल्याने ‘रांगसाईडर्स’वर बऱ्यापैकी अंकुश लागला आहे; तथापि शहरातील अनेक मार्गांवर गाडी वळविण्यासाठी वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणून १५० ते २०० मीटर अंतरावर यू-टर्न घेण्यासाठी जागा आहे. मात्र शॉर्टकट मारण्यावर भर असणारे वाहनचालक रांगसाईडने गाडी नेणे पसंत करतात. कॉलेजमधून निघाल्यानंतर काही अंतरावर जाऊन गाडी वळविण्यापेक्षा अनेक बाईकर्स राँगसाईडने वाहने हाकतात. शहरातील शिवाजी, लाहोटी, तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोरुन तर सर्रास रांगसाईड वाहतूक सुरू आहे. ११ महिन्यांत १५,२८१ राँगसाईडर्सजानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत शहर वाहतूक शाखेने तब्बल १५ हजार २८१ विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केली. १११ सुसाट वाहनचालकांचा यात समावेश आहे. २३ भरधाव वाहनांवर दंड आकारला आहे.