शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भाषणे इंग्रजीत येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 8:12 PM

आपल्या ओजस्वी व अत्यंत प्रभावी वाणीने आणि खंजिरीच्या निनादात सर्वसामान्यांचे प्रबोधन व त्यांना मंत्रमुग्ध करणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर दिलेल्या सर्व भाषणांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यात येणार आहे.

- सचिन मानकर दर्यापूर - आपल्या ओजस्वी व अत्यंत प्रभावी वाणीने आणि खंजिरीच्या निनादात सर्वसामान्यांचे प्रबोधन व त्यांना मंत्रमुग्ध करणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर दिलेल्या सर्व भाषणांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यात येणार आहे. या पुस्तकाचे संपादन विख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण विजय भटकर करतील. राष्ट्रसंतांच्या भाषणांचा संग्रह करून ते ‘राष्ट्रसंतांची भाषणे’ या पुस्तकस्वरूपात लेखक बाबा मोहोड यांनी संपादन करून प्रकाशित केला आहे. याच पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्याची संकल्पना दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे यांनी मांडली. ते अकोला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. श्रीगुरुदेव प्रकाशन (गुरुकुंज मोझरी) यांच्याकडून या भाषांतराबाबत गाडगेबाबा मंडळाने परवानगी मिळवली आहे. राष्ट्रसंतांच्या भाषणांच्या इंग्रजी पुस्तकाचे संपादन विख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण विजय भटकर करतील.भाषांतराची जबाबदारी कलावंत यशश्री अशोक काशीकर (रा. वरूड) यांनी गाडगेबाबा मंडळाच्यावतीने स्वीकारली आहे . काही दिवसांपूर्वी गुरुकुंज आश्रम येथील भेटीदरम्यान विजय भटकर, डॉ. राजाराम बोथे, प्रकाश महाराज वाघ, गजानन भरसकळे, डॉ. अनिल वाघ, अमोल बांबल व निखिल पडघान यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली. ‘राष्ट्रसंताची पत्रे’ या बाबा मोहोड लिखित मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर तयार झाले असून, ते अंतिम तपासणीसाठी श्रीगुरुदेव प्रकाशनकडे सादर करण्यात आले आहे. दर्यापूर येथील प्रा. जी.के. पाटील यांनी भाषांतरित केलेल्या या इंग्रजी पुस्तकाचे संपादन डॉ. भटकर यांनीच केले आहे. यानंतर ‘राष्ट्रसंतांची प्रवचने’ हे मराठी पुस्तकसुद्धा इंग्रजीत भाषांतर करण्याची योजना आहे. तिन्ही पुस्तके इंग्रजीत आणून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार जगभरात करण्याचा मनोदय भारसकळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र