फोटो - १२एएमपीएच०१ - चौफुलीवर रास्ता रोको करताना आंदोलक
१२एएमपीएच०२ - यावेळी पटावरील बैलही आणण्यात आला.
यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील बैलगाडा स्पर्धा शौकिनांचा सहभाग, तळेगावचे आयोजन राज्यात गाजणारे, माजी आमदारांनी केले आंदोलनाचे नेतृत्व
धामणगाव रेल्वे - तळेगाव दशासर (अमरावती) : तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू असलेल्या देवगाव (ता. धामणगाव रेल्वे) चौफुलीवर गुरुवारी वऱ्हाड बैलगाडा (शंकर पट) स्पर्धा संघटना अमरावती/यवतमाळ तसेच तळेगाव येथील पटप्रेमींच्यावतीने शंकरपट पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व तत्कालीन आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले. यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील बैलगाडा स्पर्धा शौकिनांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवत पट बैलगाडा स्पर्धा सुरू करण्याची मागणी केली.
गत काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर या बैलगाडा स्पर्धा सुरू करण्याकरिता रास्ता रोको व अन्य आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देवगाव चौफुलीवरही पटप्रेमींनी नागपूर-औरंगाबाद सुपर एक्स्प्रेस हायवेवर काही काळासाठी रास्ता रोको केला. शासनाच्या या कायद्याला रद्द करून ग्रामीण क्षेत्रातील विशेष रूपाने तळेगाव दशासर येथील पंचकोशीत प्रसिद्ध असलेला तसेच शंभर वर्षे जुना शंकरपट सुरू करण्याकरिता शासनाला केंद्राला व न्यायालयाला ही बंदी हटवून बैलगाडा स्पर्धा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी वीरेंद्र जगताप यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच तळेगाव ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व गावातील नागरिक तसेच तळेगाव, देवगाव, हिरपूर, मालातपुर, महिमपूर, घरफळ, बाभूळगाव आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
मध्य प्रदेश, कर्नाटकात पटाला बंदी नाही. तेथे पोलीस संरक्षणात पट भरविण्यात येते. मात्र, महाराष्ट्रात हा कायदा का? शेतकऱ्यांचा खरा साथीदार बैलाला मानतो. कायदा जिवावर उठणारा नको, यासाठी माझा संघर्ष सुरू आहे.
- वीरेंद्र जगताप, माजी आमदार, धामणगाव रेल्वे