अमरावती : बोगस शिधापत्रिका धारकांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने पुरवठा विभागाने आधारकार्ड लिंकिंग नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची शोधमोहिम सुरू केली आहे. जिल्हास्तरावर या प्रक्रियेला वेग आला असून १५ आॅगस्टपर्यंत या शिधापत्रिकांचा शोध घेण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा विभागासह तहसीलदारांना देण्यात आले आहेत. दरम्यान आधार कार्ड नसलेल्या शिधापत्रिका बोगस ठरणार आहेत. जिल्ह्यात १४ तालुक्यांतून सार्वजनिक वितरण प्रणाली राबविण्यात येणार आहे. पुरवठा विभागाने हायटेक होत याअंतर्गत ग्राहकांना एसएमएस सुविधाही पुरविली आहे. जिल्ह्यात बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, एपीएल आदींचे सुमारे ५ लाख ९२ हजार ४४२ इतके शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये अंत्योदयचे १ लाख २१ हजार ३७२, बीपीएलचे २ लाख ४८ हजार ४५८, एपीएलचे २ लाख ८ हजार ६५३ व १३ हजार ९५९ पांढरे कार्डधारक आहेत. वर्षभरापासून रेशन दुकानदारांमार्फत आधार कार्ड जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र अनेकदा मुदतवाढ देऊनही हे काम रखडत असल्याची स्थिती आहे. पुरवठा विभागाने पहिल्या टप्प्यात आॅनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. बँक खात्यासोबतच आधारकार्ड जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून सध्या जिल्हाभरात तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली आधार लिंकिंगचे काम सुरू आहे. नियुक्त एजन्सीमार्फत हे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांची उदासिनतासर्वेक्षणासाठी नियुक्त रेशन दुकानदारांकडून आधारकार्डची माहिती पुरवण्यात येत नसल्याने या कामाला दिरंगाई होत असल्याची तक्रार एजन्सी चालकांकडून होत आहे. तर ग्राहकांकडून आधारकार्डची माहिती दिली जात नसल्याचे रेशन दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे यांनी सांगितले.नागरिकांकडील आॅनलाईन, आॅफलाईन फिडिंग केलेल्या आधारकार्ड तपासणीचे काम सुरू आहे. यासह डेटा अपडेट करण्यासह नोंदणी दरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे कामही वेगात सुरू आहे. तहसील कार्यालयांना यासंबंधीच्या सूचनाही दिल्या आहेत.- डी.के.वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
‘आधार’ नसल्यास शिधापत्रिका होणार रद्द
By admin | Published: August 11, 2016 12:02 AM