करजगाव : शासकीय धान्य वितरण प्रणालीमार्फत देण्यात येणारे धान्य विशेषत: तांदूळ खुल्या बाजारात विकला जात आहे. शासकीय धान्य खुल्या बाजारात विकल्यास शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा कायमचा बंद करण्यात येणार आहे.
शिरजगाव कसबा येथील २५ मे रोजी शिरजगाव पोलिसांनी १६५ पोते धान्य जप्त केले. तेथील कमलेश्वर मनोहर केदार यांनी त्याच्या गावानजीक शेतातील टिनाच्या शेडमध्ये १४ ते १५ रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतलेले तांदूळ ठेवले होते. शिरजगाव पोलिसांनी गोपनीय माहितीचे आधारे धाड टाकून ५५ किलो तांदूळ असलेले १६५ पोते जप्त केले.
केदार यांच्याकडे धान्य परवाना नाही. ते रेशनधारकांकडूनच १४ ते १५ रुपयांप्रमाणे धान्य प्रमाणात खरेदी करीत असून, आदिवासी बांधवांना तेच धान्य २० रुपये दराप्रमाणे विकत असल्याची कबुली दिली.
बॉक्स
गुन्हा दाखल
गोंदियामधून खरेदी केलेल्या तांदुळाबाबत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीस चौकशीत संशय बळावला होता. मात्र, पुरवठा निरिक्षक शैलेश देशमुख यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कमलेश्वर केदार यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कोट
शिरजगावप्रकरणी चौकशीअंती गुन्हा नोंदविण्यात आला तसेच रेशनचे धान्य बाजारात विकल्याचे आढळल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल.
- शैलेश देशमुख, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, अचलपूर