शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

‘पॉस’द्वारे रेशन वितरण सुरु

By admin | Published: January 19, 2017 12:16 AM

जिल्ह्यातील शिधापत्रिका आता ‘आॅनलाईन’ करण्यात आल्या आहेत व त्याच्याशी आधार बँक खाते संलग्न करण्यात आले आहे.

‘आॅनलाईन’ व्यवहार : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या हस्ते तिवस्यात शुभारंभतिवसा : जिल्ह्यातील शिधापत्रिका आता ‘आॅनलाईन’ करण्यात आल्या आहेत व त्याच्याशी आधार बँक खाते संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुरवठा विभागाद्वारे ‘पॉस’ (पाऊंट आॅफ सेल) या उपकरणाद्वारे रेशनधान्य वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील वाढोणा व शेंदूरजना खुर्द येथे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे हस्ते मंगळवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे नीमा माहोरे व वाढोणा येथे शांता राठोड यांच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानात ‘पॉस’ उपकरणाची संगणकीय प्रणालीची जोडणी करुन लाभार्थ्यांना या प्रणालीद्वारे धान्य वितरण करण्यात आले. जीपीआरएस प्रणाली सोबत कनेक्ट असणाऱ्या पॉश मशीनद्वारे ज्या ग्राहकाला धान्य द्यायचे आहे त्या ग्राहकाला अंगठा द्यावा लागणार आहे. धान्याचे वाटप तसेच दर व झालेली किंमत याची माहिती मशीनद्वारे उपलब्ध होते. तसेच दुकानामध्ये महिना अखेरीस किती धान्य शिल्लक आहे, याची माहिती पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डि.के. वानखडे व तहसीलदार राम लंके यांनी उपस्थित लाभार्थ्यांना या प्रणालीची माहिती दिली. येत्या ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानामधील व्यवहार याच पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रणवीर, सहाय्यक अधिकारी फुलझेले, पुरवठा शाखेचे अव्वल कारकून नरेंद्र कुरळकर, पुरवठा निरीक्षक वैशाली यादव तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच व लाभार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अशी मिळते माहितीया ‘पॉस’ उपकरणाद्वारे रेशन दुकानाला किती धान्याचा कोटा मिळाला, ग्राहकांना किती धान्याचे वाटप करण्यात आले व महिन्याअखेर दुकानात किती धान्य शिल्लक आहे, याची माहिती आॅनलाईनरित्या संकेतस्थयावर नोंदविल्या जाणार आहे.