शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पोलीस, सरकार, बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये रंगला युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 10:35 PM

नवनीत रवि राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या विलंबमाफी याचिकेवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्ष, पोलीस प्रतिनिधी व बचाव पक्षांत युक्तिवाद झाला. ११ जानेवारीला यासंबंधी निर्णय होईल.

ठळक मुद्देआनंदराव अडसुळांविरुद्धचा खटला : नवनीत यांच्या पुनर्निरीक्षण-विलंबमाफी याचिकेवर ११ ला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवनीत रवि राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या विलंबमाफी याचिकेवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्ष, पोलीस प्रतिनिधी व बचाव पक्षांत युक्तिवाद झाला. ११ जानेवारीला यासंबंधी निर्णय होईल.विधी सुत्रानुसार, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान खासगी वृत्तवाहिनीने बसगाडीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात शाब्दिक वाद झाला. नवनीत यांच्या तक्रारीनुसार गाडगेनगर पोलिसांनी खा. अडसुळांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि जिवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे नोंदविले. पुढे हे फाइल पोलिसांनी बंद करण्याचा अहवाल प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने २०१६ साली हे प्रकरण एकतर्फी खारीज केले. कायद्यानुसार ९० दिवसांत पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली जाऊ शकते. ३१ मे २०१८ रोजी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांचे वकील दीप मिश्रा आणि परवेज खान यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात ४ जून २०१८ रोजी पुनर्निरीक्षण आणि विलंब माफी याचिका दाखल केली. मंगळवारी विलंबमाफी याचिकेवर सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील परिक्षीत गणोरकर तर खा. आनंदराव अडसूळ यांच्यातर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनी युक्तिवाद केला.असा झाला युक्तिवाद-२०१४ मध्ये हे प्रकरण पोलिसांनी बंद केले. त्याला ९० दिवसांच्या आत आव्हान द्यायला हवे होते, मात्र, चार वर्षांपर्यंत तसे केले गेले नाही. त्यामुळे विलंबमाफी याचिका दाखल करता येत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांतर्फे सरकारी पक्षाचे अभियोक्ता अ‍ॅड. परीक्षित गणोरकर यांनी केला.-खा.अडसूळ यांचे वकील अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनीही सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला समर्थन दिले. बातम्या आणि सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर झाली असल्यामुळे ती मिळाली नाही, हे म्हणणे गैर आहे, असे डोरले यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.-वकील परवेझ खान यांनी तो युक्तिवाद खोडून काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, कलम १५७ व १७३ नुसार पोलीस आणि मॅजिस्ट्रेट यांनी फिर्यादीला त्यासंबंधीची माहिती कळविणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. ते त्यांनी पार पाडले नाही. बातम्या वा सोशल मीडियामार्फत जाहीर झालेली माहिती यासाठी ग्राह्य धरता येणार नाही, कारण की, कायद्याला ती माध्यमे पर्याय नाही, असा युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्यांचाही हवाला त्यांनी न्यायासनाला दिला. 'अ‍ॅझम्पशन' आणि 'प्रिझम्पशन'वर न्यायनिर्णय करण्याऐवजी तो कायद्याच्या कलमांच्या आधारांवर केला जावा, असा अग्रह खान यांनी धरला.