शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शिक्षण विभागात आढळला पुन्हा कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:11 AM

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गत दोन दिवसांपूर्वी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याशिवाय ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गत दोन दिवसांपूर्वी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याशिवाय एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीलासुद्धा कोरोनाची लागण झाली. अशातच शुक्रवारी पुन्हा एक कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळला. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या चार वर पोहोचली आहे. शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होऊ घातली आहे. या निवडणुकीनिमित्त मतदान प्रक्रियेसाठी ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली आहे, त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यानुसार शिक्षण विभागात आतापर्यंत दोन कर्मचारी व एका महिला कर्मचाऱ्याचा पती असे तिघे कोरोनाग्रस्त आढळून आले होते. अशातच आता शुक्रवारी एका कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाग्रस्त कर्मचारी आढळून आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागासह परिसर सॅनिटाईझ करण्यात आला. याशिवाय अन्य खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई.झेड. खान यांनी दिली.

बॉक्स

कामकाज सुरूच

प्राथमिक शिक्षण विभागात कोरोनाग्रस्त कर्मचारी आढळून आल्यानंतर शिक्षण विभागात प्रशासकीय कामकाज सुरूच आहे. शिक्षण विभागात एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीसह तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले नाही. या विभागात कामकाज सुरू असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कार्यालय काही दिवस बंद ठेवले जात होते. आता मात्र कार्यालय सुरू ठेवले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.