लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : शहरातील आठवडी बाजारातील मशीद परिसरातील ४८ वर्षीय इसमाचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. सबब, धामणगाव शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आरोग्य यंत्रणा व नगरपालिकेने संबंधित परिसर सील केला, तर संपर्कातील सात जणांचे थ्रोट स्वॅब घेण्यात येणार आहेत.शहरातील आठवडी बाजार परिसरातील एका ४८ वर्षीय इसमाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला १८ जून रोजी शहरातील खाजगी रुग्णालयात तपासण्यात आले. मात्र, त्रास अधिक वाढल्याने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. शनिवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्यासोबत असलेल्या कुटुंबातील तीन सदस्यांना व रुग्णासोबत थेट संपर्क आलेल्या कुटुंबातील अन्य चार व्यक्तींना अमरावती येथे थ्रोट स्वॅबसाठी पाठवण्यात आले आहे. शनिवारी नगरपालिका व तालुका प्रशासनाने हा परिसर सील केला. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग १४ दिवस दत्तापूर कॉटन मार्केट या परिसराचे सर्वेक्षण करणार आहे.दरम्यान, शनिवारी तातडीने कोरोनाग्रस्ताच्या घर व परिसरातील ११८ कुटुंबांतील ५३६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी दिली. या परिसरात कोणालाही एन्ट्री देण्यात येणार नाही, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी सांगितले.आठवडी बाजार परिसरातील हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने सध्या तरी या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रविवारी या भागात भाजीपाल्याचा लिलाव होणार नाही, असे तहसीलदार भगवान कांबळे यांनी सांगितले. तालुक्यातील ग्रामीण भागात तळेगाव दशासर येथील दोन्ही ग्रामस्थांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर वकनाथ येथील तिघांचे अमरावती येथे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यांचा अहवाल सोमवारी सकाळपर्यंत प्राप्त होईल, असे तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी सांगितले. वकनाथ येथील तिघे जण यवतमाळ जिल्हयातील नेर येथील कोरोनाग्रस्त आजोबाच्या संपर्कात आले होते.धामणगाव शहरातील ४८ वर्षीय इसम कोरोना संक्रमित आढळला. त्या अनुषंगाने संपर्कातील व्यक्तींची यादी बनविण्यात येत आहे. सात व्यक्तींना थ्रोट स्वॅबसाठी अमरावतीला हलविले.- भगवान कांबळेतहसीलदार, धामणगाव रेल्वे
धामणगावात पुन्हा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 5:00 AM
शहरातील आठवडी बाजार परिसरातील एका ४८ वर्षीय इसमाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला १८ जून रोजी शहरातील खाजगी रुग्णालयात तपासण्यात आले. मात्र, त्रास अधिक वाढल्याने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. शनिवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला.
ठळक मुद्देकोरोना । सात जणांचे घेतले थ्रोट स्वॅब, आठवडी बाजार परिसर सील