लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षा दिलेल्या ३० हजार ७०९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन झाले आहे. यापैकी ३८.०६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, हे विशेष.विद्यापीठात सेमिस्टर पॅटर्न लागू झाल्यामुळे उन्हाळी व हिवाळी असे वर्षातून दोन परीक्षा घेण्यात येतात. अभ्यासाचा ताण असल्यामुळे बरेच विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे पुनर्मूल्यांकनात वाढसुद्धा झाली आहे. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करणे, शुल्क भरणे आदी बाबी विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतात. सेमिस्टर पॅटर्नमुळे पुनर्मूल्यांकनाचे प्रमाण वाढीस लागले आहे. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. बरेचदा पेपर व्यवस्थित सोडविला तरी मूल्यांकन अचूक झाले नाही, तर विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केल्याशिवाय पर्याय नाही. प्रतिपेपर पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास किमान २०० रुपये शुल्क अदा करावे लागते. त्याअनुषंगाने दरवेळी परीक्षेत २५ ते ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी पुनर्मूल्याकनासाठी अर्ज करीत असल्याचे चित्र आहे. पुनर्मूल्यांकनात ३५ ते ४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याची आकडेवारी आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकनात दोष, त्रुटी कायम असल्याचे हे वास्तव दर्शविते. ३० हजार ७०९ पैकी ११ हजार ६८९ विद्यार्थ्यांची पूनर्मूल्यांकनानंतर गुणवाढ झाली. शुल्कापोटी ६१ लाख ४१ हजार रुपये विद्यापीठ तिजोरीत जमा झाले आहे.पुनर्मूल्यांकनासाठी विद्याशाखानिहाय नोंदणीकॉमर्स अँड मॅनेजमेंट- ५०९१ह्युमॅनिटीज- ३३७७इंटरडिसिप्लिनरी स्टडीज- १३६७सायन्स अँड टेक्नॉलॉजी- २०८७४पुनर्मूल्यांकनाची नियमावली आहे. त्यानुसार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जाते. २५ टक्क््यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्यास संबंधित परीक्षकांवर कायदेशीर कारवाई केली जाते.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.
अमरावती विद्यापीठात ३० हजार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन; ६१ लाख तिजोरीत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 8:26 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ परीक्षा दिलेल्या ३० हजार ७०९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन झाले आहे.
ठळक मुद्दे२०१६ विद्यार्थ्यांनी मिळविली छायाप्रत