गजानन मोहोड
अमरावती: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. केंद्र व राज्यसरकारच्या जनसंपर्काचे काम करणाऱ्या एका कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हे संकेतस्थळ तयार केले आहे.
माझे साहित्य लोककल्याणासाठी करोडोमुखी व कानी जाऊ द्यावे, असा अखेरचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या निर्वाणापूर्वी २० ऑगस्ट १९६८ रोजी बॉम्बे हॉस्पिटल येथून दिला होता. राष्ट्रसंताचे तत्कालिन सचिव जनार्दन बोथे यांनी हा संदेश तेव्हा रेकार्ड करुन जतन केला होता.
संकेतस्थळाच्या अनावरणप्रसंगी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचारप्रमुख प्रकाश वाघ, सेवाश्रम समिती प्रमुख डॉ राजाराम बोथे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ पुरुषोत्तम पाळेकर, दिलीप कोहळे, सुशिल वणवे, डॉ दिगंबर निघोंट यांच्यासह केंद्रीय कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक यावेळी उपस्थित होते.पाच हजार प्रकारात राष्ट्रसंताचे गद्य अन् पद्यराष्ट्रसंतांनी पाच हजार प्रकारची गद्य व पद्य प्रकारात विशाल ग्रंथसंपदेची रचना केली. त्यामध्ये खास करून ग्रामगीता, मेरी जापान यात्रा, अभंगगाथा, लहरकी बरखा, श्रीगुरुदेव मासिक, आदेश रचना इत्यादी ग्रंथसंपदेचा समावेश आहे. सेवा म्हणून कंपनी संकेतस्थळाची हाताळणी, देखभाल व दैनंदिन कार्यचलन मोफत करणार आहे.