मतदारयादी पुनर्निरीक्षण : मतदारांची होणार पडताळणीअमरावती : मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करून नावांची खातरजमा करण्यात येणार आहे. सदोष मतदार यादी तयार करण्यासाठी आयोगाद्वारा हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. येत्या फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात महापालिका, ९ नगरपरिषदा व ५९ जिल्हा परिषद गट व ९८ पंचायत समितींच्या गणांची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने आयोगाची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१७ अखेरपर्यंत मतदार याद्या पुनर्निरीक्षणाचा विशेष कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम ५ जानेवारीपर्यंत राबविला जाणार आहे. १४ आॅक्टोबरपर्यंत यादीवर घेतलेल्या हरकती व दावे स्वीकारले जाणार आहे. ३० सप्टेंबरला मतदार याद्यांशी संबंधित भाग, ग्रामसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाचन करून या नावांची खातरजमा करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या हरकती व दाव्यांवर सुनावणी घेण्यात येऊन निकाली काढले जाणार आहे. तत्पूर्वी १५ डिसेंबर २०१६ पर्यंत डाटाबेस अद्ययावत करण्यात येणार आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१७ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले आहेत, अशा व्यक्तींनी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत नावनोंदणी करावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. नोंदणी करण्यासाठी नवीन मतदारांना वयाचा दाखला, रहिवासी दाखला आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सादर करावे लागणार आहे. मतदार नोंदणीचे सर्व प्रकारचे अर्ज संबंधित बीएलओ आणि तहसील कार्यालयाकडे नि:शुल्क उपलब्ध करण्यात आले आहेत. महिला मतदार नोंदणीसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गटामार्फत प्रयत्न होत आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमात नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक मतदार नोंदणी होऊन मतदानाचा टक्का वाढावा व पारदर्शी वातावरणात नि:पक्षपणे निवडणुकी पार पडाव्यात यासाठी आयोगाची लगबग सुरू आहे.विहित नमुन्यात करावे लागणार अर्जमतदार यादीशी संबंधित नमुना क्रमांक ६ हा अर्ज मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६-अ हा अनिवासी भरावयाचा अर्ज, नमुना क्रमांक ७ हा मतदार यादीतील नावावर हरकती घेण्याकरिता किंवा नाव कमी करण्यासाठी आहे. तसेच नमुना क्रमांक ८ यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये दुरूस्ती करण्यासाठी आणि नमुना क्रमांक ८ अ, हा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ‘आॅनलाईन’ नोंदणीविहित नमुन्यातील अर्ज, हरकती, सर्व मतदान केंद्र व अतिरिक्त मतदान केंद्रावर सर्व प्रकारचे अर्ज स्विकारल्या जातील, आॅनलाईन अर्ज करण्यासाठी आयोगाचे संकेतस्थळालाही (सीईओ) भेट देता येते. त्या संकेतस्थळावर नावनोंदणीची सोय आहे. ज्यांची नावे नोंदणी राहिली असेल त्यांनी नोंदणी करावी व ज्यांनी ‘२५ जानेवारी’ या राष्ट्रीय मतदार दिनी नावनोंदणी केली अशा मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
ग्रामसभांमध्ये होणार मतदार याद्यांचे वाचन
By admin | Published: October 02, 2016 12:17 AM