अमरावती: पोलिसांचा गणवेश धारण करून व्यवसायिकांना लुबाडणार्या तोतया पोलिसाला घेऊन राजापेठ पोलीस ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ करणार आहेत. त्या तोतयाने शहरात कुठे तोतयागिरी केली, हे त्यातून उलगडणार आहे. दरम्यान, त्या तोतया पोलिसाला स्थानिक न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
विनायक सुधाकर इंगळे (३०, रा. इंजोरी, ता. मानोरा, जि. वाशिम) असे आरोपीचे नाव आहे. त्याला २० जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी सबनिसप्लॉट भागातून पोलीसी गणवेशात तोतयागिरी करताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास त्याच्या भाड्याच्या घराची झडती घेतली असता, अमरावती पोलीस असल्याचे बोगस आयकार्ड व पोलीस टीशर्ट व टोपी जप्त करण्यात आले. ततपुर्वी त्याचेविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४१९, १७१, १७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला गुरूवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.
उपस्थित करण्यात आले.
महागडी दुचाकी चोरीची
सबनिस प्लॉट येथून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडील एमएच २७ एएम ७८६८ या क्रमांकाची दुचाकी चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. एक आठवड्यापुर्वी त्याने ती गाडगेनगर पोलीसांच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. तर, पोलीसी गणवेश त्याने पुणे येथून शिवून घेतल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.
अशी होती पध्दत
अनलॉक झाले असले, तरी शहरात सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा आहे. ती बाब हेरून आरोपी मोठ्या रूबाबात महागड्या दुचाकीने वेळेनंतर उघड्या असणार्या दुकानात पोहोचयचा, चालान फाडण्याची तंबी द्यायचा, जाऊ द्या ना साहेब, असे म्हटले की या तोतयाचे काम फत्ते व्हायचे, हजार दोन हजार रुपये घेऊन तो पोबारा व्हायचा. लगेच दुसरा परिसरात तोतयागिरी करायचा, असे प्राथमिक तपासादरम्यान उघड झाले आहे.
कोट
तोतया पोलीस बनून नागरिकांंना ठगविणार्या आरोपीला न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याने नेमकी कुणाकुणाशी ठकबाजी केली. कुणाला कसे लुबाडले, हे तपासादरम्यान उघड होईल.
मनीष ठाकरे, ठाणेदार
राजापेठ