शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पश्चिम विदर्भातील वास्तव : ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास; अस्मानी, सुल्तानी संकटाचे रोज ३ बळी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 09, 2024 10:30 PM

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्येक राज्यकर्त्यांद्वारा करण्यात आलेली आहे.

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत. यंदाच्या सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये सर्वाधिक १७० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या आहे. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरदिवशी तीन शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.

दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. सन २००१ पासून राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रवण १४ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतल्या जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २०,६३० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ९,५१६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्येक राज्यकर्त्यांद्वारा करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात या गंभीर विषयाकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शासन योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळणाऱ्या एक लाखांच्या शासन मदतीच्या निकषात १९ वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.

सन २००१ पासून विभागातील स्थितीएकूण शेतकरी आत्महत्या : २०६३०शासन मदत प्राप्त प्रकरणे : ९५१६विविध कारणांनी नाकारली : १०६७६चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणे : ३०६

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याराज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. मात्र, याची कारणमीमांसा जिल्हा प्रशासनाने केलेली नाही. शेतकरी आत्महत्यांची क्लस्टर शोधून उपाययोजना राबविण्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, पुढे काही झालेच नाही. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या सहा महिन्यात १७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दर ३० तासात एक शेतकरी आत्महत्या होत असल्याची शोकांतिका आहे.

मार्च महिन्यात सर्वाधिक ११७ प्रकरणेविभागात सहा महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक ११७ शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. जानेवारीत ९०, फेब्रुवारीमध्ये १००, एप्रिल ९६, मे ८४ व जून महिन्यात ७० शेतकरी आत्महत्या झाल्या. जूनअखेर अमरावती जिल्ह्यात १७०, यवतमाळ १५०, बुलढाणा १११, अकोला ९२ व वाशिम जिल्ह्यात ३४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

 

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरी