आॅनलाईन लोकमतअचलपूर : ऐतिहासिक व शैक्षणिक कौशल्यासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या अचलपूरच्या मातीने आता संत्रा बाजारात आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. येथील संत्री थेट ढाक्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. संत्रा व्यवसायाचा झेंडा सीमापार नेण्यात येथील संत्राउत्पादक अजय लकडे व अतुल लकडे यांचा मोलाचा वाटा आहे. अचलपूरच्या संत्रा व्यावसायिकांनी देशाच्या सीमेपलीकडे असलेल्या बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरात संत्री विक्रीसाठी पाठविली असून, संत्रा उत्पादक शेतकºयांसाठी नवे दालन उपलब्ध केले आहे.भारताचे शेजारी पाकिस्तान आणि भूतानच्या काही भागात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु, पाकिस्तानातील संत्र्यापेक्षा अचलपुरी संत्र्यालाच बांगलादेशीयांनी प्रथम पसंती दिली आहे. त्या अनुषंगाने बांग्लादेश येथील व्यापारी थेट अचलपुरातच येवून ट्रकने संत्री त्यांच्या देशात नेत आहेत.अचलपुरातील काळी कसदार जमीन, नैसर्गिक साधनसंपत्ती, मुबलक पाणी व पोषक हवामान या गुणांमुळे शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमिनीवर संत्राबागा उभ्या केल्या आहेत. मृग आणि आंबिया या दोन बहरांची संत्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आंबिया बहराचे क्षेत्र कमी असल्याने आणि वातावरण प्रतिकूल असल्याने दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळेच आंबिया बहाराच्या संत्र्याला मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी पडत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.अचलपूरच्या संत्रा उत्पादक शेतकºयांना चांगला भाव मिळावा, याकरिता अचलपूर येथील अजय लकडे व अतुल लकडे यांनी हरम मार्गावर अत्याधुनिक मशीनद्वारे संत्र्याची छाटणी, व्हॅक्सीनेशन, विभागणी, पॅकिंग सेंटर सुरू केले आहे. मंडई उभारून शेतकºयांचा संत्रा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पोहचविला. इतकेच नव्हे मागणीनुसार विदेशातही संत्रा पाठविला आहे.व्यापाऱ्यांकडून प्रत्यक्ष बगीच्यात संत्र्यांची खरेदी व तोडणी केली जात नाही. त्यावेळी मंडीत संत्र्यांचे पॅकिंग करणे हा चांगला पर्याय शेतकºयांकडे उपलब्ध असतो. त्यामुळे शेतकरी मंडीच्या माध्यमातून स्वत:चा माल देशाच्या सीमेपलीकडे पाठवू लागला आहे.चुटकी संत्रीबांग्लादेश येथील एक व्यापारी बदरसेठ अचलपुरात येऊन थेट लकडे यांच्या पॅकिंग सेंटरमधून दोन ट्रक संत्री ढाक्याकरिता नेतात. ही एक शेतकऱ्यांसाठी निश्चित अभिमानाची बाब आहे. ही संत्री ढाक्यात ‘चुटकी संत्री’ या नावाने ओळखली जातात, हे विशेष.संत्री पॅकिंग करून थेट परदेशात पाठविली जात असल्यामुळे याचा फायदा अचलपूर परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.- अजय लकडेसंत्रा उत्पादक
अचलपूरची संत्री बांग्लादेशच्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:28 AM
ऐतिहासिक व शैक्षणिक कौशल्यासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या अचलपूरच्या मातीने आता संत्रा बाजारात आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.
ठळक मुद्देव्यवसायाचा सीमापार झेंडा : लकडे बंधू शेतकऱ्याने संत्र्याला दिली नवी ओळख