शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य लाभले

By admin | Published: July 09, 2017 12:21 AM

स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात वेगळाच आनंद आहे.

बच्चू कडू : बालाजी मंदिर सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरणलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात वेगळाच आनंद आहे. समाजकार्यातून समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळत असते. हे समाजकार्य करण्यात माहेश्वरी समाज नेहमीच अग्रेसर असतो. माहेश्वरी समाज हा सर्वाधिक दानशूर समाज आहे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनीकेले. ते स्थानिक श्री बालाजी मंदिर संस्थानद्वारा आयोजित सत्कार समारोहात सत्काराला उत्तर देत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रवींद्र पवार, प्रमुख अतिथी श्रीवल्लभ भट्टड, ब्रिजमोहन हरकुट, प्रहारचे अतुल खुपसे, सचिन खुळे, मंगेश देशमुख, सुभाष मेश्राम, छोटू महाराज वसू, अभियंता विनोद औतकर, प्रमोद कुदळे, रमेश कारमोरे, मुजफ्फर हुसेन, अंजली पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ. बच्चू कडू यांनी दिलेल्या ७ लक्ष रुपयांच्या निधीतून बालाजी मंदिरात सभागृह निर्मिती सुरू आहे. या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. सोबतच आ. कडू यांचे स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच आ. बच्चू कडू यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये रचिता सारडा, गौरी नांगलिया, हर्ष कोठारी, राधा नांगलिया, सेजल चांडक, निशा मुंदडा, राधा चांडक, खुशबू नांगलिया, केतकी वर्मा, ऋषभ छाजेड, टिलोर मुणोत यांचा समावेश होता. तसेच सुरेखा श्याम भट्टड यांचा समावेश आहे.