शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

स्थायी समितीत भूसंपादनाला मान्यता

By admin | Published: December 31, 2015 12:13 AM

शहरात ले-आऊटमध्ये विविध विकास कामांसाठी आरक्षित असलेल्या जागा न्यायालयाचा आधार घेत त्या हडप करण्याचे कटकारस्थान रचणाऱ्या ....

ऐतिहासिक निर्णय : आरक्षित जागा हडप करणाऱ्यांना बसणार चपराकअमरावती : शहरात ले-आऊटमध्ये विविध विकास कामांसाठी आरक्षित असलेल्या जागा न्यायालयाचा आधार घेत त्या हडप करण्याचे कटकारस्थान रचणाऱ्या बिल्डर्संना स्थायी समितीने भूसंपादनाला बुधवारी मान्यता प्रदान करुन चपराक दिली आहे. सभापती विलास इंगोले यांनी घेतलेला हा निर्णय शहरवासीयांसाठी ऐतिहासिक ठरणारा आहे.स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सभापती विलास इंगोले यांच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला कुसूम साहू, योजना रेवस्कर, राजेंद्र तायडे, वंदना हरणे, सारीका महल्ले, कांचन उपाध्याय, अजय गोंडाणे, दिगंबर डहाके, सुनीता भेले, भारत चव्हाण, तुषार भारतीय, हफिजाबी युसूफ शाह, शेख हमीद शद्दा, अंजली पांडे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रशासनाकडून आलेल्या महापालिका अधिनियमानुसार १९६६ चे कलम १२७ अंतर्गत प्राप्त खरेदी सुचनेप्रमाणे विकास योजना आरक्षणा खालील जागा संपादन प्रकरणी १६ कोेटी ५ लाख अग्रीम ठेव रक्कम १३ व्या वित्त आयोग निधी, विकास शुल्क व भूसंपादन शिर्षामधून जागा ताब्यात घेण्याला मान्यता देण्यात आली. सातुर्णा सर्व्हे क्र. ३/१ या जागेवरील विकास योजना आरक्षण क्र. ४३३ प्राथमिक शाळा व आरक्षण क्र. ४३६ खेळाचे मैदान असे एकूण ९५ आर इतकी जागा संपादनाला मंजुरी प्रदान करण्यात आली. ८ कोटी ७९ लाख ७७ हजार ८८० रुपयातून ही आरक्षित जागा संपादित केली जाणार आहे. उर्वरित सहा आरक्षित जागांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण व्हायची असल्यामुळे त्या संपादन करण्याला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय सभापती विलास इंगोले यांनी घेतला. बिल्डर्सचे मनसुबे धुळीसअमरावती : यापूर्वी निधी नसल्याचे कारण पुढे करुन १५ ते २० आरक्षित जागा महापालिकेतून बिल्डर्संनी गिळंकृत केल्याचे उदाहरण घडले आहेत. मात्र आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आरक्षित जागा भूसंपादनासाठी लागणाऱ्या रक्कमेची जुळवाजुळव करुन तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविला होता. परंतु स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले यांनी शहराच्या हितासाठी आरक्षित जागा संपादन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अन्य आरक्षित जागांचे देखील लवकरच भूसंपादन करुन त्या ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. तसेच अन्य विकास कामांना मंजुरी देताना शिवटेकडी येथे रेन गन खरेदी व बांधकामासाठी साडे तीन लाख रुपयांना मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्र्याचे आगमन अन् ५० लाखांच्या रस्त्याला मंजुरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १ जानेवारी रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री जाणार आहेत. त्याअनुषंगाने अकोली ते क्रांती कॉलनी हा डीपी रस्ता निर्माण करणे अनिवार्य आहे. यापूर्वी या रस्त्याच्या दोन वेळा निविदा प्रकाशित करण्यात आल्यात. मात्र या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी मुख्यमंत्र्याच्या आगमनाचे औचित्य साधून हा रस्ता तातडीने पूर्ण करावयाचा असल्यामुळे बुधवारी स्थायी समितीने ५० लाख रुपयाला मान्यता प्रदान करण्यात आली. हे रस्ते निर्मितीचे काम सरळ पद्धतीने देण्यात आले असून विर हनुमान कन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आले आहे.