शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

अपात्र उमेदवारांची बीडीओंकडून शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 9:00 PM

शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत फ्रेन्चायशी स्वरुपात विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ४९ पैकी ४० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविद्युत सेवकांची नियुक्ती : ४९ पैकी ४० ग्रामपंचायतींचे प्रस्ताव न पाहताच पाठविले

प्रभाकर भगोले।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत फ्रेन्चायशी स्वरुपात विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ४९ पैकी ४० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यात सातवी पास झालेल्याची ग्रामपंचायतीने शिफारस केल्याचे उघड झाले आहे.पंचायत समितीच्या बीडीओंनी त्यात सुधारणा न करता जशीच्या तशीच यादी जिल्हा परिषदेला सादर केली आहे. त्या दोन उमेदवारांजवळ आयटीआय प्रमाणपत्र नसतानाही पंचायत समितीचे प्रशासन किती पारदर्शक आहे, त्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.महाराष्टÑ शासनाच्या निर्णयानुसार विशिष्ट अटीवर फ्रेन्चायशी म्हणून विद्युत सेवक नेमण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार ग्रामपंचायतीने कोणती कामे करावी हेही त्यात नमूद आहे. वीज सेवक नेमताना एसएससी. व आयटीआय (ईले.) डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. वीज सेवकाची पात्रता त्या गावातील उमेदवाराची नसेल तर ५ किलोमिटरच्या परिसरातील जाहिरात देऊन वीज सेवकाची नेमणूक करावी, अशी अट सुद्धा शासकीय परिपत्रकात नमूद आहे. परंतु पंचायत समिती चांदूररेल्वेच्या प्रशासनाने ग्रामपंचायतीने निवड केलेल्या उमेदवारांची शहानिशा न करता जशीच्या तशी यादी जि.प.ला मंजुरीसाठी दाखल केली आहे.४९ ग्रामपंचायतींपैकी तीन हजारांचेवर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत जळका (जगताप), आमला, घुईखेड, पळसखेड, मालखेड गावाचा समावेश आहे. तीन हजाराचेवर लोकसंख्या असल्याने विद्युत सेवक शासकीय आदेशाने नेमण्यात येणार नाही.अशा आहेत विद्युत सेवकांच्या जबाबदाºयामीटर रीडिंग घेणे, वीज देयके वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करून पूर्ववत वीज पुरवठा सुरू करणे, डी.ओ. फ्यूज टाकणे, फ्यूज कॉल अटेंड करणे, रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन जोडणीची कामे करणे व थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे या जबाबदाºया विद्युत सेवकांना पार पाडावयाच्या आहेत.नियंत्रण ठेवणार कोण ?विद्युत सेवकावर महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांचे तांत्रिक नियंत्रण व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण राहील व त्याचे मानधन प्रतिग्राहक ९ रुपये याप्रमाणे असेल. प्राप्त होणारे उत्पन्न किंवा तीन हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम महावितरण कंपनीमार्फत देण्यात येईल. विद्युत कामाच्या जोखमीसाठी त्याचे विमा संरक्षणासाठी महावितरण कंपनीद्वारा योग्य अशी योजना तयार करण्यात येणार आहे.विद्युत सेवक अपात्र उमेदवारांची यादी चांदूररेल्वेच्या प्रभारी खंडविकास अधिकारी यांना दाखविण्यात आली आहे. ती यादी आम्ही पाठविली असून अपात्र निवड केलेल्या ग्रामपंचायतींना नोटीस देऊन ती नावे कमी करण्यासाठी लेखी पत्र पाठविण्यात येणार आहे.- सोनाली माडकर,प्रभारी खंडविकास अधिकारीपंचायत समिती, चांदूररेल्वे