शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

प्रलंबित कृषिपंपांच्या जोडणीसाठी तंबी

By admin | Published: June 11, 2017 12:07 AM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही.

पालकमंत्री संतापले : संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी करून व यासाठी पैसे भरणा करून देखील त्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली नाही. ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांर्भीयाने घेतली आहे. ह्या जोडण्यांचे काम त्वरित करण्यात यावे व यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात पाच हजार ६०० कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.पालकमंत्र्यांनी शिवारफेरीच्या निमित्ताने जिल्ह्यातील १२३ गावांना भेटी दिल्यात, या संपर्क अभियानाच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यावेळी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. या पार्श्वभूमीवर वीजजोडणी संदर्भात तक्रारींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिलेत. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेहेत्रे, कार्यकारी अभियंता डी.बी. मोहोड, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या अर्जावर वर्षानुवर्ष जर कार्यवाही होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. यासाठी संबधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. कामासाठी नियुक्त कंत्राटदार जर ऐकत नसेल तर याविषयी वरिष्ठांना कळविणे आवश्यक आहे. शेतकरी, नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची दर १५ दिवसांत बैठक घ्यावी व अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. रोहीत्र बसविणे किंवा नादुरूस्त असलेले बदलविणे आदीविषयी प्राप्त अर्जांवरदेखील कार्यवाही करावी. विहीत मुदतीत सौर कृषिपंपांचे काम व उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याचे व वाकल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.वीज अपघाताची सर्व प्रकरणे मंजूर कराअनेकदा विजेच्या धक्कयाने अपघात होवून नागरिक दगावतात. त्या व्यक्तींच्या परिवाराने मदतीसाठी केलेले अर्ज नामंजूर करण्याचे प्रकार घडतात. यापुढे असा एकही प्रकार होता कामा नये, असी तंबी त्यांनी दिली. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांसी सौजन्याने वागले पाहिजेत. त्यांच्या मागण्या समजवून घेवून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.व त्यांना वस्तूस्थितीची माहिती दिली पाहिजे असे पालकमंत्र्यांनी सांगीतले. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी आहेत व १७०० कृषिपंप वाटपाचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट विहीत कालावधित पूर्ण करावे व शेतकऱ्यांप्रति अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.