शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

१७ रेल्वे प्रवाशांकडून ६५०० रूपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:44 PM

येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर वाणिज्य विभागाकडून विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी सकाळी ८ वाजता १७ विनातिकीट प्रवाशांकडून ६५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम निरंतरपणे सुरू असणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.

ठळक मुद्देविनातिकीट प्रवास भोवला : अमरावती रेल्वेस्थानकावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर वाणिज्य विभागाकडून विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी सकाळी ८ वाजता १७ विनातिकीट प्रवाशांकडून ६५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम निरंतरपणे सुरू असणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.मार्च महिन्यात सर्वच विभाग उत्पन्नवाढीसाठी आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरसावतात, हा दरवेळेचा अनुभव आहे. मात्र, अमरावती रेल्वेच्या वाणिज्य विभागाने कधीचेच वाणिज्य उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परंतु अलीकडे फुकट्या प्रवासी वाढल्याच्या पार्श्वभूमिवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागातील वाणिज्य वरिष्ठांनी अशा प्रवाशांविरुद्ध धडक कारवाईचे आदेश बजावले आहे. बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकाचे वाणिज्य विभागप्रमुख शरद सयाम यांच्या नेतृत्वात बुधवारी ही मोहीम राबविली. या कारवाईत अमरावती रेल्वे स्थानकावरील मुख्य तिकीट निरीक्षक किन्हीकर, तिकीट निरीक्षक साखरकर, देशमुख, वेलेकर, बोहते, बरडेकर, हर्षद राऊत, संदीप दुधे, आशिष घरडे आदी उपस्थित होते.तिकीट न घेता प्लॅटफार्मवर प्रवेशयेथील मॉडेल रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट न घेता बहुतांश प्रवासी ये-जा करतात. विनातिकीट प्रवास अथवा प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वे स्थानकावर प्रवेश घेणे हे रेल्वे नियमानुसार गुन्हा आहे. मॉडेल रेल्वे स्थानकावरील तिकीट विक्रीचा आलेख बघितल्यास प्लॅटफार्म तिकीट घेण्याचे प्रमाण अल्पच आहे. दरदिवशी मॉडेल रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवासी तपासणी मोहीम हाताळल्यास सर्वाधिक प्रवासी विनातिकीट आढळतील, हे वास्तव आहे.